2023
-
महावितरणला गव्हर्नन्स नाऊ कडून दोन विभिन्न श्रेणींमध्ये प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त
महावितरणला सार्वजनिक धोरण आणि सुशासन यावर महत्व केंद्रित करणारे प्रतिष्ठित प्रकाशन गव्हर्नन्स नाऊ कडून दोन विभिन्न श्रेणींमध्ये प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा पुरस्कार समारंभ 7 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झाला. महावितरणला माहिती तंत्रज्ञानाचा अप्रतिम वापर, ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि माहिती विश्लेषणाद्वारे धोरणात्मक निर्णय घेण्याची सुविधा या दोन्हीसाठी ही मान्यता देण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्रा आणि संचालक (संचलन) श्री संजय ताकसांडे यांनी कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले.माननीय उपमुख्यमंत्री आणि ऊर्जा मंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांनी आधुनिक माहिती तंत्रज्ञानाच्या व्यापक वापराद्वारे महावितरणमधील ग्राहक सेवा वाढविण्याची निर्देश दिले आहेत. या अनुषंगाने महावितरणने विविध उपाययोजना राबविल्या आहेत. माहिती तंत्रज्ञान विभाग वीज वापर, वीज देयके आणि वीज पुरवठ्यातील समस्यांशी संबंधित माहितीचे संकलन आणि विश्लेषण करण्यात सक्रियपणे सहभागी आहे. या सर्वसमावेशक दृष्टिकोनामुळे निर्णय प्रक्रियेलाच फायदा झाला असून कंपनीला राष्ट्रीय मान्यताही मिळाली आहे. महावितरणचे मुख्य महाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान) श्री अविनाश हावरे यांच्या नेतृत्वाखाली, प्रणाली विश्लेषक आणि पर्यायी मुख्य माहिती सुरक्षा अधिकारी श्री दिनेश लडकत आणि अनुदेशक श्री हसीब खान यांनी महावितरणच्या वतीने पुरस्कार स्वीकारला.गव्हर्नन्स नाऊ द्वारे आयोजित हा पुरस्कार सोहळा विशेषत: सार्वजनिक उपक्रमांमध्ये माहिती तंत्रज्ञानाच्या वापरावर केंद्रित होता. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात देशभरातील अनेक सार्वजनिक क्षेत्रातील कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करणाऱ्या पुरस्कारांचे हे आठवे वर्ष आहे.
-
छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी महावितरणला सहा पुरस्कार
ऑल इंडिया रिन्युएबल एनर्जी असोसिएशन या संस्थेने गोव्यात आयोजित केलेल्या नवीकरणीय ऊर्जा उत्सवात छतावरील सौर ऊर्जा निर्मितीच्या क्षेत्रातील लक्षणीय कामगिरीसाठी महावितरणला सहा पुरस्कार मिळाले.महावितरणचे संचालक श्री. प्रसाद रेशमे यांनी देशातील सर्वाधिक घरगुती सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री श्री.प्रमोद सावंत यांच्याहस्ते आणि केंद्रीय नवीकरणीय ऊर्जा राज्यमंत्री श्री.भगवंत खुबा यांच्या उपस्थितीत पुरस्कार स्वीकारला. सौर ऊर्जा निर्मितीबाबत राष्ट्रीय पातळीवर महावितरणचा सन्मान झाल्याबद्दल कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री.लोकेश चंद्र यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
एआयआरईए या संस्थेने गोव्यात नवीकरणीय ऊर्जा उत्सवाचे आयोजन केले होते. श्री.प्रमोद सावंत, श्री.भगवंत खुबा यांच्यासह गोव्याचे ऊर्जामंत्री श्री.सुदीन ढवळीकर आणि केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव श्री.ललित बोहरा उपस्थित होते. केंद्र सरकारतर्फे घरगुती ग्राहकांना सौर ऊर्जेद्वारे छतावरील वीजनिर्मितीसाठी अनुदान दिले जाते. यासाठी मंत्रालयाने स्वतंत्र वेबसाईट निर्माण केली आहे. त्या अनुषंगाने पुरस्कार देण्यात आले. देशातील सर्वाधिक घरगुती सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीसाठीचा पुरस्कार महावितरणला मिळाला. हा पुरस्कार महावितरणचे संचालक श्री.प्रसाद रेशमे यांनी स्वीकारला.राष्ट्रीय पातळीवर सर्वात गतिमान पद्धतीने व सर्वाधिक संख्येने सौर निर्मिती एजन्सीना जोडल्याबद्दलचा पुरस्कार महावितरणचे विशेष प्रकल्प विभागाचे मुख्य अभियंता श्री.चंद्रमणी मिश्रा यांनी स्वीकारला. घरगुती ग्राहकांनी छतावरील सौरऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीच्या बाबतीत परिमंडल स्तरावरील सर्वाधिक प्रकल्पांसाठीचा पुरस्कार महावितरणचे नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.दिलीप दोडके यांना जाहीर झाला.ग्राहकांच्या तक्रारींचे सर्वाधिक वेगाने निराकरण करण्याबद्दलचा पुरस्कार महावितरणचे नाशिक परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.दीपक कुमठेकर यांनी स्वीकारला. ग्राहकांच्या जागृतीबाबत सर्वोत्कृष्ट कामगिरीचा पुरस्कार महावितरणच्या पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता श्री.राजेंद्र पवार यांनी स्वीकारला. संबंधित यंत्रणांशी सर्वोत्कृष्ट समन्वयासाठीचा पुरस्कार महावितरणचे विशेष प्रकल्प विभागातील कार्यकारी अभियंता श्री.शरद बंड यांना मिळाला.छतावरील सौर ऊर्जा निर्मिती प्रकल्प उभारणीबाबत महावितरणने प्रभावी कामगिरी केली आहे. महावितरण घरगुती ग्राहकांना असे प्रकल्प उभारणीसाठी सर्व प्रकारची मदत करते. या ग्राहकांना केंद्र सरकारकडून अनुदान मिळते. केंद्र सरकारच्या नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्रालयाने महावितरणला दुसऱ्या टप्प्यात जानेवारी २०२४ पर्यंत १०० मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता रूफ टॉप सोलरच्या माध्यमातून निर्माण करण्याचे उद्दीष्ट दिले आहे. त्यापैकी सुमारे ८२ मेगावॅटची क्षमता कंपनीने जुलै महिन्यातच गाठली आहे व त्यातून १८,०६८ ग्राहकांना लाभ झाला आहे. महावितरणच्या या सर्वोत्कृष्ट कामगिरीची राष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे.
-
इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी सुविधांच्या विकासाबद्दल महावितरणला सर्वोत्कृष्ट पुरस्कार
‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या नवी दिल्ली येथे आयोजित इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या परिषदेत बुधवारी महावितरणला चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या विकासात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक मा. विजय सिंघल यांनी या यशाबद्दल कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. सोसायटी ऑफ मॅन्युफॅक्चरर्स ऑफ इलेक्ट्रिक व्हेईकल्स (एसएमईव्ही) या संस्थेचे महासचिव श्री. अजय शर्मा यांच्या हस्ते मा. प्रसाद रेशमे यांनी महावितरणतर्फे पुरस्कार स्वीकारला.उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांचे मार्गदर्शन व मा. विजय सिंघल यांच्या नेतृत्वात महावितरणने इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंगबाबत कामगिरी केली, असे मा. प्रसाद रेशमे यांनी पुरस्कार स्वीकारताना सांगितले.राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठीच्या पायाभूत सुविधा उभारण्यासाठी महावितरणला राज्याची नोडल एजन्सी म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. महावितरणच्या पुढाकाराने राज्यात एकूण ३२१४ चार्जिंग स्टेशन्स उभारण्यात आली आहेत. महावितरणने राज्यात स्वतःची ६२ विद्युत वाहने चार्जिंग स्टेशन्स उभारली आहेत. पुण्यात २३, ठाण्यात ११, नवी मुंबईत १२, नागपूरमध्ये ६ यासह नाशिक, छत्रपती संभाजीनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि सांगली या शहरात ही स्टेशन उभारण्यात आली आहेत. या स्टेशन्सवर चार्जिंग करणाऱ्या वाहनांची संख्या गेल्या सप्टेंबरपासून सातत्याने वाढत आहे.महावितरणने इलेक्ट्रिक वाहनांच्या चार्जिंगसाठी स्टेशन उभारायचे असेल तर त्यासाठी स्वतंत्र वेबसाईट सुरू केली आहे. तसेच महावितरणच्या पॉवरअप ईव्ही या ॲप्लिकेशनचा वापर करून वाहनचालक आपल्या जवळचे चार्जिंग स्टेशन शोधू शकतात तसेच वाहनाच्या चार्जिंगसाठी या मोबाईल ॲपचा वापर करू शकतात.
-
महावितरणला सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार
‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआयए)’ या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला मिळाला असून याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार मिळाले.महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी या यशाबद्दल अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले. महावितरणचे अधीक्षक अभियंता निखिल मेश्राम यांनी बेळगाव येथे एका समारंभात हे पुरस्कार कंपनीच्या वतीने नुकतेच स्वीकारले. यावेळी व्यासपीठावर केंद्रीय विद्युत प्राधिकरणाचे अध्यक्ष घनश्याम प्रसाद, केंद्रीय विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष प्रमोद देव, महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष व्ही. पी. राजा, आयपीपीएआयचे संचालक हॅरी धौल, हरयाणा विद्युत नियामक आयोगाचे माजी अध्यक्ष आर. एन. प्रशेर आणि इंडियन रिन्युएबल एनर्जी डेव्हलपमेंट एजन्सीचे माजी संचालक चिंतन शाह उपस्थित होते. आयपीपीएआय ही संस्था १९९४ साली स्थापन झाली असून देशातील विद्युत क्षेत्राच्या विकासातील महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा घडविण्यासाठी तटस्थ मंच म्हणून काम करते. वीज क्षेत्रातील देशभरातील मान्यवर या संस्थेशी जोडलेले आहेत.महावितरणची सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणून निवड करताना वीज ग्राहक संख्या, विजेची विक्री, विजेची उत्तम उपलब्धता, बिल वसुलीची कामगिरी, वितरण हानी, अपारंपरिक ऊर्जा वापर आणि स्मार्ट मीटरचा वापर अशा अनेक बाबींचा विचार करण्यात आला.महावितरणला ग्राहकांमध्ये जागृती निर्माण करणारी सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनी म्हणूनही पुरस्कार मिळाला. याबाबतीत महावितरणचे ग्राहक कॉल सेंटर, तक्रारीसाठी टोल फ्री नंबरची उपलब्धता, राज्यभरातील ग्राहक तक्रार निवारण केंद्रे, सौर ऊर्जेचा वापर करण्यासाठी ग्राहकांना केलेले मार्गदर्शन, वीज अपघात टाळण्यासाठी केलेली जागृती, ग्राहक मेळावे, ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी केलेला सोशल मीडिया तसेच वृत्तपत्रांचा व चॅनेल्सच्या माध्यमाचा वापर इत्यादींचा विचार करण्यात आला.महावितरणने रेडिओ फ्रिक्वेन्सी आधारित मीटर रिडिंगचा वापर चालू केला आहे. राज्यात ९४ लाख मीटरच्या बाबतीत अशी सुविधा सुरू केली असून ही संख्या वाढत आहे. या व्यवस्थेत रेडिओ फ्रिक्वेन्सीचा वापर करून विजेच्या मीटर्सचे अचूक रिडिंग घेता येते. यामुळे बिले अचूक देण्यास मदत होते तसेच वीज वापराची माहिती चांगल्या रितीने उपलब्ध होते. आगामी काळात राज्यातील ग्राहकांना स्मार्ट मीटर देण्यात येणार आहेत.तसेच, महावितरणने आपल्या कामात माहिती तंत्रज्ञानाचा अत्यंत कल्पकतेने व व्यापक उपयोग केला आहे. महावितरणने विकसित केलेले मोबाईल ॲप्लिकेशन, एसएमएस अलर्ट व्यवस्था, रोख भरणा केंद्रांना ऑनलाईन जोडणे, ‘महा पॉवर पे’, हे स्वतःचे ई वॉलेट विकसित करणे तसेच तक्रार निवारणासाठी माहिती तंत्रज्ञानाचा वापर यांचा विचार पुरस्कार देताना करण्यात आला. कंपनीला ‘इनोव्हेटीव्ह आयटी ॲप्लिकेशन्स इन पॉवर सेक्टर’ या गटातही पुरस्कार मिळाला.
-
इलेक्ट्रिक वाहनांच्या वापरासाठी सुविधेबद्दल महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
इलेक्ट्रिक वाहनधारकांची गाड्यांच्या चार्जिंगची समस्या सोडविण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड २०२३’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे एका समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.इंडिया स्मार्ट ग्रिड फोरम (आयएसजीएफ) या संस्थेतर्फे २०१७ पासून ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड’ दिले जातात. वीज, पाणी, वायू आणि विद्युत वाहनांच्या क्षेत्रात नवा मानदंड प्रस्थापित करणाऱ्या कंपन्यांना हे पुरस्कार दिले जातात. महावितरणला ‘इमर्जिंग इनोव्हेशन इन इलेक्ट्रिक मोबिलिटी डोमेन’ या वर्गवारीत विजेता म्हणून पुरस्कार मिळाला.केंद्र सरकार व राज्य सरकारचे इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याचे धोरण आहे. त्यासाठी महाराष्ट्रात महावितरणला राज्य नोडल एजन्सी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे. इलेक्ट्रिक वाहनांसाठी विशेष दर निश्चित करणे, इलेक्ट्रिक वाहनांसाठी चार्जिंगच्या पायाभूत सुविधा विकसित करणे, चार्जिंग स्टेशन उभारणे, वेब पोर्टल विकसित करणे आणि मोबाईल ॲप विकसित करणे असे विविध पुढाकार महावितरणने हाती घेतले आहेत.महावितरणने स्वतःची ‘इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन्स’ उभारण्यासोबतच इलेक्ट्रिक वाहनधारकांसाठी पॉवर अॅप नावाचे मोबाईल ॲप विकसित केले आहे. त्याचा वापर करून इलेक्ट्रिक वाहनधारक जवळचे चार्जिंग स्टेशन शोधून काढू शकतो, स्वतः गाडीचे चार्जिंग करू शकतो आणि त्यासाठीचे पैसे ऑनलाईन भरू शकतो. महावितरणच्या चार्जिंग स्टेशनसोबत खासगी चार्जिंग स्टेशनबद्दल माहिती मिळण्यासाठी हे ॲप उपयोगी पडते. पॉवर अप या मोबाईल ॲप्लिकेशनमधील ‘मॅप मी’ या सुविधेच्या आधारे महावितरणच्या तसेच अन्य कंपन्यांच्या चार्जिंग स्टेशनची माहिती मिळते.हे ॲप मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये काम करते. महावितरणला केंद्रीय पद्धतीने सर्व चार्जिंग स्टेशन्सवर देखरेख ठेवणे शक्य होते. आतापर्यंत या ॲप्लिकेशनवर २५०० खासगी व महावितरणची चार्जिंग स्टेशन्स जोडली गेली आहेत. यापूर्वी आत्मनिर्भर भारत शिखर परिषद स्कोच २०२२ पुरस्काराने या प्रकल्पाचा सन्मान झाला आहे.महावितरणच्या कार्यालयात आणि सब स्टेशन्समध्ये इलेक्ट्रिक वाहनांची चार्जिंग स्टेशन काही ठिकाणी उभारण्यात आली आहेत व ती मनुष्यबळाशिवाय चालतात. तेथे जाऊन वाहनचालक स्वतः चार्जिंग करून घेऊ शकतो. महाराष्ट्रात महावितरणने इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन्ससाठी विविध ठिकाणी जागा निश्चित केल्या असून चार्जिंग स्टेशन्सची संख्या गतीने वाढविण्याचे नियोजन केले आहे.
-
छ्तांवरील सौरऊर्जा निर्मितीसाठी महावितरणला राष्ट्रीय पुरस्कार
घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या ‘रूफ टॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने विजेता जाहीर केले असून नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या कोलकतास्थित संस्थेची स्थापना १९२५ साली उद्योगपती जी. डी. बिर्ला यांच्या नेतृत्वाखाली झाली. देशातील अनेक प्रतिष्ठित व मोठे उद्योगसमूह चेंबरचे सदस्य आहेत. चेंबरने नवी दिल्ली येथे हरित ऊर्जेविषयी चर्चा करण्यासाठी आयोजित शिखर परिषदेत हरित ऊर्जा क्षेत्रातील देशभरातील मान्यवरांच्या उपस्थितीत विविध वर्गवारीतील पुरस्कार प्रदान करण्यात आले. माजी केंद्रीय ऊर्जा सचिव श्री अनिल राजदान व ईआरइडाएचे माजी अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री के. एस.पोपली यांच्याहस्ते महावितरणचे अधीक्षक अभियंता श्री चंद्रमणी मिश्रा यांनी ‘रूफ टॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणतर्फ़े पुरस्कार स्विकारला. महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी या पुरस्कारासाठी महावितरणच्या अधिकारी आणि कर्मचा-यांचे अभिनंदन केले आहे.घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून निर्माण झालेली वीज स्वतः वापरायची आणि जास्त निर्मिती झाली तर महावितरणला विकायची अशी ‘रूफटॉप सोलर’, योजना आहे. या योजनेला महावितरणच्या ग्राहकांची पसंती मिळाली आहे. राज्यात दि. २२ फेब्रुवारी रोजी रूफ टॉप सोलर बसविणाऱ्या ग्राहकांची संख्या ७९,५६४ झाली होती व त्यांच्याकडून १३८७ मेगावॅट वीजनिर्मिती क्षमता गाठली गेली होती.राज्यामध्ये पाच वर्षांपूर्वी २०१६ -१७ या आर्थिक वर्षात घरगुती रूफ टॉपचे केवळ १,०७४ ग्राहक होते व २० मेगावॅट सौरऊर्जा निर्मिती क्षमता होती. गेल्या पाच वर्षांत त्यामध्ये मोठी वाढ झाली आहे व १,३८७ मेगावॅटची क्षमता गाठली गेली आहे. चालू आर्थिक वर्षात एप्रिल २०२२ नंतर आतापर्यंत ३५६ मेगावॅट सौर ऊर्जा निर्मिती क्षमतेची भर पडली आहे.सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे वीजबिलात बचत होण्यासोबत पर्यावरण रक्षणाला मदत होते.
घरगुती ग्राहकांप्रमाणे औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना महावितरणच्या www.mahadiscom.in/ismart या वेबसाईटवर जाऊन अर्ज करायचा असतो. पॅनेल बसविणाऱ्या एजन्सीसह सर्व बाबतीत महावितरणची मदत मिळते.
,
2022
-
देशात ऊर्जा क्षेत्रात महाराष्ट्र सर्वोत्तम,महाराष्ट्राला ऊर्जाक्षेत्रासाठी स्टार ऑफ गव्हर्नन्स – स्कॉच पुरस्कार प्रदान
देशातील सर्वोत्तम कामगिरीसाठी स्कॉच संस्थेतर्फे दिला जाणारा प्रथम पुरस्कार मिळाल्याने राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी मा.ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे तर मा.ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवार्ड इन पॉवर ॲण्ड एनर्जी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ही महाराष्ट्राच्या द्दष्टीने अतिशय अभिमानास्पद कामगिरी आहे.
नवी दिल्ली येथे झालेल्या एका कार्यक्रमात ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे यांनी हा पुरस्कार स्वीकारला. ऊर्जा क्षेत्रातील उल्लेखनीय कार्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या ऊर्जा विभागाने ‘इंडिया गव्हर्नन्स फोरम’ च्या ‘स्कॉच स्टेट ऑफ गव्हर्नन्स रिपोर्ट २०२१’ मध्ये देशात प्रथम क्रमांक पटकावला. राज्यातील ग्राहकांना, शेतक-यांना व उद्योगांना गुणवत्तापूर्ण वीज पुरवठा करण्यासाठी मा. मुख्यमंत्र्यांचे सहकार्य व साथ मोलाची ठरले, अशा भावना त्यांनी व्यक्त केल्या.“मागील दोन वर्षात तौक्ते व निसर्ग या चक्रीवादळाच्या प्रकोपासोबतच कोरोनाचा काळ असतानाही महावितरणने ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा व उच्चदर्जाची सेवा दिली. कोळसा टंचाई असतानाही राज्याला भारनियमनाच्या संकटापासून वाचविले. हा पुरस्कार म्हणजे विपरित काळात दिलेल्या गुणवत्तापूर्ण सेवेचा आणि ऊर्जा विभागातील कर्तव्यनिष्ठ प्रत्येक अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांचा सन्मान आहे,’’ अशा शब्दात मा.ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी ऊर्जा विभागातील सर्वांचे अभिनंदन केले आहे.
ऊर्जा विभागाला प्रगती पथावर नेण्यासाठी मी सातत्याने प्रयत्न करून नियोजन केले. यासाठी धोरणे आखली. त्याला तीनही वीज कंपन्यांचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांनी आपल्या कणखर, कुशल व प्रभावी प्रशासकीय व व्यवस्थापकीय कौशल्याने ही कामगिरी साध्य करण्यात मोलाचे योगदान दिले. त्याबद्दल त्यांचे आभार मानतो. याशिवाय संचालक मंडळ, सर्व अधिकारी, कर्मचारी व तंत्रज्ञ यांनी एकसंघ पद्धतीने केलेले काम व त्यांना त्यांच्या कुटुंबियांची लाभलेली साथही मोलाची ठरली.ऊर्जा विभागाला देशात अव्वल बनविण्याच्या माझ्या व शासनाच्या प्रयत्नांना साथ दिल्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो व अभिनंदनही करतो,” अशी प्रतिक्रिया मा.ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांनी या पुरस्काराबाबत व्यक्त केली.‘एचव्हीडीसी योजने’अंतर्गत एकूण १ लाख २९ हजार ५४६ कृषीपंप ऊर्जान्वित झाले. ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत एकूण ९९ हजार ७४४ कृषीपंप बसविण्यात आले. एप्रिल २०२१ पासून सुरू झालेल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे १२ हजार १०२ घरगुती वीजजोडणी देण्यात आली. तसेच एप्रिल महिन्यात राज्यात वीज संकट निर्माण झाले असतांना विक्रमी वीजनिर्मिती करून राज्यातील जनतेला भारनियमनमुक्त ठेवण्यात महत्वपूर्ण योगदान कंपनीने दिले आहे. -
महावितरणला डिजिटल इनोव्हेशन इनिशिएटिव्ह (ट्रान्सपोर्ट आणि मोबिलिटी) श्रेणी अंतर्गत Elets इनोव्हेशन पुरस्कार
महावितरणला डिजिटल इनोव्हेशन इनिशिएटिव्ह (ट्रान्सपोर्ट आणि मोबिलिटी) श्रेणी अंतर्गत त्याच्या EV उपक्रमांसाठी प्रतिष्ठित Elets इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.श्री प्रसाद रेशमे (संचालक प्रकल्प) यांना आत्मनिर्भर भारत समिटमध्ये डॉ रवी गुप्ता (संस्थापक, सीईओ आणि मुख्य संपादक, इलेट्स टेक्नोमीडिया) यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
महावितरणच्या ईव्ही उपक्रमांमध्ये महावितरणचे स्वतःचे इलेक्ट्रिक व्हेईकल चार्जिंग स्टेशन, ईव्ही वापरकर्त्यांसाठी पॉवरअप मोबाइल अँप, इलेक्ट्रिकल व्हेईकल चार्जिंग इन्फ्रास्ट्रक्चर ऑपरेशन सेंटर सोल्यूशन आणि वेब पोर्टल यांचा समावेश आहे.
पॉवरअप मोबाईल अँप हे 4 व्हीलर ईव्ही मालकांसाठी महावितरणच्या चार्जिंग स्टेशनवर ईव्ही चार्ज करण्यासाठी विकसित केले आहे. मोबाईल अँपमध्ये ‘मॅप-मी’ वैशिष्ट्य आहे ज्याद्वारे महावितरणच्या अंतर्गत नसलेल्या चार्जिंग स्टेशन स्थानकांचे स्थान आणि तपशील देखील प्रदर्शित केले जाऊ शकणार. हे अँप विविध ठिकाणी जसे की महावितरणची विविध कार्यालये, सबस्टेशन्स इत्यादींवर महावितरणच्या मानवरहित ईव्ही चार्जिंग स्टेशनचे निरीक्षण, डेटा लॉगिंग आणि डेटा विश्लेषण करण्याची सुविधा देते. -
महावितरणला राष्ट्रीय स्तरावरील ‘पॉवर अवॉर्ड्स २०२२’ या सहा पुरस्कारांनी गौरविण्यात आले.
वीज वितरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणला इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (IPPAI) द्वारे सहा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शनिवारी (9 रोजी) बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित ‘पॉवर अवॉर्ड 2022’ कार्यक्रमात ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव (GoI), श्री. घनश्याम प्रसाद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्राहकाभिमुख सेवा, नावीन्य, तंत्रज्ञानाचा वापर या श्रेणींमध्ये देशातील विविध वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (IPPAI) द्वारे पॉवर अवॉर्ड 2022 जाहीर करण्यात आला आहे. महावितरणला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत.इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया पुरस्कार
- सर्वाधिक प्रगतीशील SERC नूतनीकरणीय प्रोत्साहन (नूतनीकरणक्षम उर्जेला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्तम राज्य).
- उत्कृष्ट कामगिरी – सर्वोत्कृष्ट कंपनी – इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन
- उत्कृष्ट कामगिरी – सर्वोत्कृष्ट कामगिरी करणारी वितरण कंपनी
- सर्वोत्कृष्ट नवकल्पना – आरएफ मीटरिंग आणि मीटर डेटा, ग्राहक सेवेतील नावीन्य – माहिती तंत्रज्ञान सेवा
- ग्राहक जागृतीला प्रोत्साहन देण्यासाठी सर्वोत्कृष्ट वितरण कंपनी (फर्स्ट रनर अप)
- गेल्या दशकात सर्वात जलद ग्रामीण विद्युतीकरण साध्य करणारी उपयुक्तता (फर्स्ट रनर अप)
महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक यांच्या नेतृत्वाखाली मा. विजय सिंघल यांनी ही कामगिरी केली आहे. महावितरणचे कार्यकारी संचालक श्री. अरविंद भाडीकर आणि अधीक्षक अभियंता श्री. मिलिंद दिग्रसकर यांनी बेळगाव येथे महावितरणच्या वतीने हे सर्व पुरस्कार स्वीकारले. या कामगिरीबद्दल ऊर्जामंत्री मा. डॉ.नितीन राऊत, ऊर्जा राज्यमंत्री मा. प्राजक्त तनपुरे, ऊर्जा विभागाचे प्रधान सचिव श्री. दिनेश वाघमारे, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मा. विजय सिंघल यांनी महावितरणच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले आहे.
-
उत्कृष्ट व दर्जेदार सेवेसाठी बेस्ट स्टेट युटीलिटी पुरस्कार
नवनवीन संकल्पनांचा प्रभावी वापर, महावितरणच्या ग्राहकांना उच्चदर्जाची सेवा मिळावी व त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून वीजहानी कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न करणे या निकषांवर महाराष्ट्राची ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराकरिता प्रथम क्रमांकाने तर ‘गुणवत्ता सुधार’ या वर्गवारीत महावितरणची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. १५ व्या इंडिया एनर्जी समिटमध्ये देशभरातील २९ वीज वितरण कंपन्यांनमधून विविध निकषांच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले. ऑनलाईन संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या वतीने संचालक(प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. इंडियन चेबर ऑफ कॉमर्सच्यावतीने जानेवारी महिन्यात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भारताचे माजी मुख्य ऊर्जा सचिव श्री. अनिल राजदान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्काराची निवड केली. महाराष्ट्र राज्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता महावितरण ही अत्यंत कठीण परिस्थितीतही चांगले काम करत असल्याचे गौरव उद्गार श्री. अनिल राजदान यांनी काढले. महावितरणला हा सन्मान म्हणजे अधिकारी-कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्ना चे फलित आहे. ग्राहकसेवेचे हे व्रत असेच जोपासत त्यात गुणात्मक वाढ करण्याचा मानस यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी या पुरस्कारकाच्या निमित्ताने व्यक्त केला. महावितरणने महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधा व वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात यशस्वी ठरली आहे. महावितरणने आपल्या दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविला असून यामुळे ग्राहकांना वीजबिल भरणे, नवीन वीजजोडणी घेणे, मीटर रीडिंग पाठवणे, तक्रार नोंदणी करणे अशा अनेक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. ईआरपी प्रणालीमुळे महावितरणच्या कामात अधिक पारदर्शकता व गतिशीलता आली आहे. येत्या काही वर्षात महावितरणकडून स्मार्ट मीटरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.
,
2019
-
इंडियन चेंबर ऑफ़ कॉमर्सचे देशपातळीवर मानाचे तीन पुरस्कार
केंद्रीय ऊर्जा मंत्रालय व इंडीयन चेंबर ऑफ़ कॉमर्सच्यावतीने आयोजित १३ व्या इंडियन एनर्जी समिटमध्ये ऊर्जा क्षेत्रातील प्रभावी कामगिरीबद्दल महावितरणला देशपातळीवर मानाचा तृतिय क्रमांकाचा एफ़िशियंट ऑपरेशन (नेटवर्क एफ़िशिएन्सी, डीएसएम) पुरस्कार – वीज यंत्रणेचे प्रभावी जाळ आणि वीजेच्या मागणीचे प्रभावी व्यवस्थापन याकरिता पुरस्काराने गौरविण्यात आले.
हरित ऊर्जा क्षेत्रात दिलेल्या प्रभावी योगदानासाठी तृतिय क्रमांकाचा ग्रीन एनर्जी (आरई उपक्रम, आरपीओ, सोलर रूफटॉप, ईव्ही, एनर्जी स्टोरेज) पुरस्कार – नवीन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्र, नवीकरणीय वीज खरेदीचे दायित्व, छतावरील सौर ऊर्जानिर्मिती, विद्युत वाहने चार्जिंग केंद्रासाठी महावितरणने आखलेले धोरण व त्याची अंमलबजावणी आणि विजेची साठवणूक या क्षेत्रात महावितरणने केलेल्या उल्लेखनिय कार्यासाठी महावितरणला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवनवीन उपक्रमांना अंगिकारीत त्यांचा झालेला प्रभाव यासाठीचा प्रतिष्ठित तृतिय क्रमांकाचा इनोव्हेशन विथ इम्पेक्ट (सामान्य राज्ये) पुरस्कार – नवनविन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्याच्या प्रभावी वापरासोबतच ग्राहकांना या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्याप्रती जागृत करण्यासाठी महावितरणने प्रभावीपणे राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी महावितरणला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
,
2018
-
MSEDCL has been awarded with ‘Special Recognition Award’ for Managing Large Customer Base in the category of Efficient Distribution & Operations for excellent management of large Consumer base at 12th India Energy Summit, Organized by Indian Chamber of Commerce and Supported by Ministry of Power, Government of India.
-
MSEDCL has been awarded with SKOCH Energy Gold Award for Centralized Vendor Payment System at SKOCH Summit 2018, an exclusive ceremony held at New Delhi on 6th December 2018. MSEDCL introduced a true ease of doing business initiative of Centralized Vendor payment system using fast, robust & secured digital payment process. Centralized payment is implemented to avoid the delay in the payments to suppliers, contractors, statutory payments and employees. As on Nov-18, the Centralized Vendor Payment System has benefitted around 81,000 Vendors who have received their dues (worth Rs. 1300 Crs) instantaneously using online payment API since go-live this system.
-
MSEDCL has been awarded with SKOCH Energy Silver Award for MSEDCL Dashboards at SKOCH Summit 2018, New Delhi. The MSEDCL Dashboards is a unique system developed at MSEDCL providing at-a-glance views of KPIs (key performance indicators) relevant to a business process (e.g. Energy sales, payment collection, material stock, or balance sheet). MSEDCL Dashboard ensured quick data analysis and helps to take appropriate decision at right time.
-
MSEDCL has also been awarded with SKOCH Order-of-Merit 2018 Awards for MSEDCL Consumer Service Initiatives, such as Centralized Customer Care Centers for all its. Consumers, sending various Meter Reading & Billing alerts through SMS to over 2 Crores registered Consumers and resolution of consumers’ complaints through social media like Twitter & Facebook.
-
MSEDCL has also been awarded with SKOCH Order-of-Merit 2018 Awards for implementing Substation Monitoring System at Akola Town. This systems enables live Data availability for various substations equipment such as circuit breaker, transformer, feeder and DC battery system which facilitates carrying out various analytics helping in taking right decisions with respect to operational, strategic and planning of the Electricity Distribution system.
,
2017
- SKOCH Order of Merit Award -2017 for Mobile Apps & Dashboard.
- Indian Smart Grid Forum (ISGF) Innovation award for Best Utility for R-APDRP Part ‘A’ implementation in India.
- Champion of Change Award- 2017 by Ministry of Skill Development and Entrepreneurship, Govt of India.
- Most Innovative Discom for the year 2017 at 5th Innovation with Impact Awards for Discoms by Indian Chamber of Commerce.
MSEDCL’s Innovative activities are as below:
MSEDCL has developed Mahavitaran Mobile application for Consumers that offers various facilities to consumers including application for new connection, bill payment, change of name and complaint registration.
MSEDCL has also developed Mobile Apps for its Employees which enable its employees to take meter reading, carry out day to day field activities such as outage management, disconnections and recovery drive, load management, feeder reading, PD verification complaint resolution etc.
MSEDCL has introduced analytics Dashboard which provide quick data analysis to higher authorities and helps them to take appropriate decision which has features such as New Service connection, Paid pending, Billing, Payments – offline / Online, Arrears Recovery/Position, Load Profile, CRM – complaint monitoring, Project Monitoring, Energy Audit. Last 3 years data can be analyzed and compared.
MSEDCL has implemented SAP ERP solution and integration with various systems for Finance, Operations and Projects functions in its daily working.
Similarly new innovative applications are developed for,- HT Consumer Help Desk
- Help Desk for New Service connections
- Release of New service connection within 24hrs in identified areas
- New power supply connection over a phone call
- Centralized Billing and collection System
- Incorporation of GIS substation
- 2nd Award under Category of Green Grid Award at 5th Innovation with Impact Awards for Discoms by Indian Chamber of Commerce.
Energy efficiency and Green Energy Initiatives:
MSEDCL has taken consumer awareness initiatives on Energy efficiency through rallies, seminar at school and public places, Distribution of pamphlets, putting the banners & hoardings, taking workshops and by making media awareness through its news letter, Distribution of LED bulbs as appreciation prize to meritorious students in the schools. MSEDCL has launched DELP (Domestic Efficient Lighting Program) in which it has distributed LED Bulb. MSEDCL has spent Rs 7.06 Crs on Demand Side Management activities.
Coverage of energy efficient initiatives as compared to total customer base:
1) Out of 1.75 crs Domestic Consumers, 40lakhs Domestic Consumers availed LEDs in DELP scheme.
2) Out of 40.16Lakhs Ag consumers 2209 Ag consumers have been benefited by star rated pump.
3) 1740 No of Ag consumers benefited by solar pump.
Renewable Energy:
MSEDCL has taken great efforts in fulfilling Renewable purchase obligation which is highest in country.
MSEDCL has adopted solar Roof top policy /regulation notified by state regulatory commission, MERC time to time.
Peak Load Management and Load Reduction Programs:DSM Program No. of Installation DELP 2.13 Cr Ag Pump set DSM 2209 Ceiling Fans 4998 HVAC scheme 20000 fans/15 HVAC chiller replacement& 15 HVAC chiller retrofitting - CBIP Award for Excellence in Capacity Building & Training.
,
2016
- Express Intelligent PSU Awards 2016 for MSEDCL Mobile Apps.
- Best Power Utility Award at 10th Indian Energy Summit 2016.
,
2015
- Best State Power Utility Award and Green Grid Award at National Energy Council organized by Ministry of Power (GoI) and Indian Chamber of Commerce at New Delhi.
,
2014
- Honoured with The National Energy Conservation Award 2014 organized by the Central Power Ministry for its contribution in the field of energy conservation.
- Bestowed with the Best Employer of the year and Best Organisation and Staff Development by the World HRD Congress 2014.
- Conferred with the Asia Pacific HRM Award 2014.
,
2013
- Maharashtra State e-Governance Award 2013 for Restructured Accelerated Power Development and Reforms Programme (R-APDRP) Part ‘A’.
- Won the 6th Indian Power Award 2013 by the Council of Power Utility, Delhi for the various works done by the Company.
- Won the second place Power Excellence Award – 2013 by the Kolkata Chamber of Commerce.
,