अज्ञात स्त्रोतांकडून आलेल्या एसएमएस/कॉल/व्हाट्सअँप संदेशांना प्रतिसाद देऊ नका.
महावितरण तुम्हाला कोणत्याही व्यक्तीशी संपर्क साधण्यास सांगत नाही
महावितरण केवळ VM-MSEDCL / VK-MSEDCL / AM-MSEDCL / JM-MSEDCL सारख्या SENDER ID वरून एसएमएस पाठवते आणि कोणत्याही वैयक्तिक मोबाइल नंबरवरून एसएमएस पाठवत नाही.
(SENDER ID मधील पहिली 2 अक्षरे ऑपरेटर आणि स्थान दर्शवितात जिथून संदेश पाठवला जात आहे आणि तो MSEDCL वर समाप्त होतो.)
ऑनलाइन पेमेंट करताना कोणत्याही परिस्थितीत तुमचा मोबाइल किंवा डेस्कटॉप स्क्रीन किंवा तुम्हाला मिळालेला OTP शेअर करू नका.
ग्राहक जवळच्या सायबर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार / एफआयआर नोंदवू शकतो किंवा राष्ट्रीय सायबर क्राइम पोर्टल “https://cybercrime.gov.in” वर ऑनलाइन तक्रार नोंदवू शकतो.