श्री. संजीव कुमार

व्यवस्थापकीय संचालक

श्री. २१ डिसेंबर २०१५ रोजी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनी लिमिटेड (महावितरण) चे व्यवस्थापकीय संचालक म्हणून संजीव कुमार यांनी पदभार स्वीकारला.

श्री. संजीव कुमार यांना रूरकी विद्यापीठातून (आता IIT रुरकी इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन इंजिनिअरमध्ये पदवी आणि आयआयटी, कानपूर येथील एमटेक कम्युनिकेशन इंजिनियरिंग येथून पदवी प्राप्त केली आहे. जमनालाल बजाज इंस्टीट्युट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज, मुंबई युनिर्व्हसिटीतर्फे फायनॅंशियल मॅनेजमेंटमध्ये ते पदवीधर आहेत.

श्री. संजीव कुमार १९९३ मधील बॅचचे महाराष्ट्र केडरचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र सरकार आणि भारत सरकारमधील पायाभूत सुविधा आणि वित्त क्षेत्रात काम करण्याचा व्यापक अनुभव आहे. सध्याच्या नेमणुकीपूर्वी, गृह व शहरी दारिद्रय निर्मूलन मंत्रालयामध्ये जॉइंट सेक्रेटरी आणि Housing for All प्रकल्पासाठी मिशन्स डायरेक्टर म्हणून काम केले आहे.

पते पंतप्रधान आवास योजना (PMAY) चे मिशन संचालक होते आणि त्यांनी त्या क्षमतेत PMAY रचना केली व शुभारंभ केला. त्यांनी ऊर्जा मंत्रालयातील संचालक म्हणून कार्य केले आहे .त्यांनी राजीव गांधी ग्रामीण विद्युतीकरण योजनेचे (RGGVY) आणि रीस्ट्रक्चर्ड एक्स्लेरेटेड पॉवर डेव्हलपमेंट अँड रिफॉर्म प्रोग्रॅम (R-APDRP) चे प्रभारी म्हणून कार्य केले आहे.

श्री संजीव कुमार यांनी पूर्वी महाराष्ट्र शासनाच्या विविध मंत्रालयांत व विभागांमध्ये काम केले आहे, जसे राज्य विक्री कर विभाग, पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग आणि उद्योग विभाग. त्यांनी महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी) चे संयुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम केले आहे.

त्यांनी महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून काम पाहिले आहे. त्यांनी महाराष्ट्रातील गोंदिया आणि जळगाव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी आणि महाराष्ट्रातील विदर्भ विभागातील नागपूर विभागात विभागीय आयुक्त म्हणून कार्य केले.