पायाभुत आराखडा प्रकल्प

पायाभुत आराखडा प्रकल्पांची प्रमुख उद्दिष्टे :
  1. ग्राहकांना अखंडीत व दर्जेदारवीज पुरवठा करणे
  2. वीज मागणीनुसार वीज पुरवठा करणे
  3. वीज वितरण हानी कमी होणे
  4. रोहित्र नादुरूस्त होण्याचे प्रमाण कमी होणे.

उपरोक्त सर्व 120 प्रकल्पांना महाराष्ट्र राज्या वीज नियामक आयोगाची तज्वत: मंजूरी प्राप्त(रु. 9013.95 कोटी) [जोड पत्र 1]
उपरोक्त 120 प्रकल्पांना खालील प्रमाणे अर्थसहाय्य मंजूर

  1. ग्रामीण विद्युतीकरण महामंडळ -42 प्रकल्प (रु. 2632.60 कोटी)
  2. पॉवर फायनान्स कॉर्पोरेशन -76 प्रकल्प (रु. 4813.71 कोटी)
  3. रायगड जिल्हा सहकारी बँक -2 प्रकल्प (रु. 235 कोटी)

एकूण अर्थसहाय्य मंजूर -120 प्रकल्प (रु. 7681.31 कोटी)

प्रकल्पाची सद्यस्थिती :

टप्पा क्र. 1 – या अंतर्गत एकूण 37 प्रकल्पांसाठी रु. 3057.18 कोटी खर्चाच्या 17 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी 25 प्रकल्पांच्या कामासाठी (रु .2442.83 कोटी) 11 कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पाची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 2]

टप्पा क्र. 2 – या अंतर्गत एकूण 88 प्रकल्पांसाठी रु. 6718.61 कोटी खर्चाच्या 53 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी 61 प्रकल्पांच्या कामासाठी (रु .5816.53 कोटी) 38 कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 3]

टप्पा क्र.2(अ) – या अंतर्गत एकूण 35 प्रकल्पांसाठी रु. 2565.66 कोटी खर्चाच्या 33 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी 28 प्रकल्पांच्या कामासाठी (रु .2250.67 कोटी) 27 कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 4]

टप्पा क्र.2(ब) – यामधे विविध क्षमतेची एच.टी. कॅप्यासिटर्स (स्टेशन टाईप), संलग्न उपकरणे व साहित्य यांचा पुरवठा, वाहातूक, बांधणी, उभारणी, चाचणी आणि कार्यान्वित करण्यासाठी रु. 45.74 कोटीचे कंत्राट दिलेले आहे व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत [जोड पत्र 5]

टप्पा क्र.4 – या अंतर्गत एकूण 3 प्रकल्पांसाठी रु. 159.76 कोटी खर्चाच्या 3 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी तीनही प्रकल्पांच्या कामासाठी (रु .146.98 कोटी) तीनही कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 6]

टप्पा क्र. 6(सी) -या अंतर्गत एकूण 3 प्रकल्पांसाठी रु. 87.32 कोटी खर्चाच्या 2 निविदा काढण्यात आलेल्या होत्या यापौकी तीनही प्रकल्पांच्या कामासाठी (रु .74.21 कोटी) 2 कंत्राट दिलेले आहेत व संबंधीत प्रकल्पांची कामे प्रगतीपथावर आहेत. [जोड पत्र 7]