डॉ.अशोक हरणे

संचालक

डॉ. अशोक हरणे महावितरणचे स्वतंत्र संचालक म्हणून २ जानेवारी २००९ रोजी रुजू झाले. गेली १२ वर्षे ते मे. आयएल अन्ड एफएस, मुंबई या नामांकित व अग्रगण्य पायाभूत वित्तीय संस्थेत विद्युत विभागाचे मुख्य कार्यकारी म्हणून कार्यरत आहेत. डॉ. हरणे यांच्या नेतृत्वाखाली संस्थेने राज्य सरकारे आणि केंद्राच्या अखत्यारितील सार्वजनिक उपक्रमांसोबत सुमारे ८४०० मे. वॉ . क्षमतेच्या अपारंपारिक ऊर्जा प्रकल्पांचे नियोजन केले आहे.

मे. आयएल अन्ड एफएस मध्ये रुजू होण्यापूर्वी डॉ. हरणे सुमारे २८ वर्षे महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळात कार्यरत होते. या काळात त्यांनी अनेक औष्णिक विद्युत प्रकल्पात काम केले. डॉ. हरणे हे बी.ई.(मेकॅनिकल), बी.ई.(इलेक्ट्रीकल) आणि पी. एच. डी. (औष्णिक अभियांत्रिकी)आहेत.

Urja
Empowering the Consumer