Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

पुण्यश्लोक

भाषा -

मेनू

श्री. धनंजय औंढेकर

Shri. Dhananjay Rambhau Aundhekar
संचालक (संचालन)

महावितरण कंपनीचे संचालक (संचालन) म्हणून श्री. धनंजय औंढेकर यांनी गुरूवारी दि. १८ जून २०२६ (दुपार नंतर) कार्यभार स्वीकारला. त्यांची या पदावर थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे. याआधी ते कार्यकारी संचालक (वितरण/प्रकल्प) म्हणून कार्यरत होते. श्री. धनंजय औंढेकर गेल्या २९ वर्षांपासून महावितरणमध्ये विविध पदांवर कार्यरत आहेत.

श्री. धनंजय औंढेकर हे मूळचे औंढा नागनाथचे (जि. हिंगोली) आहे. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी तसेच एमबीए (फायनान्स), एनर्जी ऑडिटर, नवी दिल्ली येथून अ‍ॅडव्हॉन्स सर्टिफिकेट इन पॉवर डिस्ट्रीब्यूशन मॅनेजमेंट अभ्यासक्रम विशेष प्रावीण्यासह पूर्ण केला आहे.

संचालक श्री. धनंजय औंढेकर हे १९९७ मध्ये तत्कालिन महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळामध्ये कनिष्ठ अभियंता म्हणून माजलगाव (जि. बीड) येथे रूजू झाले. सन २००६ मध्ये थेट निवड प्रक्रियेतून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. त्यानंतर २०१६ मध्ये थेट निवड प्रक्रियेतून अधीक्षक अभियंता तर २०१९ मध्ये पदोन्नतीने मुख्य अभियंता पदी निवड झाली. या विविध पदांवर श्री. धनंजय औंढेकर यांनी बीड, परभणी, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, पुणे, सोलापूर, कल्याण, मुंबई मुख्यालयात काम केले आहे.

श्री. धनंजय औंढेकर हे २०२४ पासून कार्यकारी संचालक म्हणून कार्यरत होते. त्यांच्या या कार्यकाळात महावितरणने मागेल त्याला सौर कृषिपंपमध्ये देशात प्रथम स्थान मिळवले. एकाच महिन्यात ४५ हजार ९११ सौर कृषिपंप कार्यान्वित करण्याचा जागतिक विक्रम केल्याचे गिनीज वर्ल्ड रेकॉर्डने जाहीर केले आहे. प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेत घराच्या छतावरील सौर प्रकल्पांमध्ये देशात द्वितीय स्थान पटकावले. या योजनेसाठी महावितरणने देशात सर्वप्रथम फेसलेस-पेपरलेस ही ऑनलाइन सुविधा सुरु केली. नवीन वीजजोडणी, ग्राहक नावात बदल आणि वीजभार वाढीच्या ऑनलाइन अर्जांना स्वयंचलित मंजुरीची प्रक्रिया सुरु केली. यामध्ये संचालक श्री. धनंजय औंढेकर यांचे मोठे योगदान आहे.

msedcl_logo
Urja

Empowering the Consumer