Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

पुण्यश्लोक

भाषा -

मेनू

यश

२०१८

  • घारापुरी बेट प्रकाशमान : महावितरणची अतुलनीय कामगिरी माननीय मुख्यमंत्र्यांसह मान्यवरांच्या उपस्थितीत दि.२२ फेब्रुवारी २०१८ रोजी घारापुरी विद्युतीकरणाचे लोकार्पण करण्यात आले. देशाच्या स्वातंत्र्यानंतर ७० वर्षानंतर प्रथमच युनेस्कोच्या जागतिक वारसा लाभलेल्या एलिफंटा गुफेच्या बेटावर वीज पोहोचली आहे. या प्रकल्पात २२ केव्ही, सिंगल कोअर केबल (३+१अतिरिक्त केबल) समुद्राखालून ७.५ किमी टाकण्याचे काम करण्यात आले आहे. माननीय पंतप्रधानांनी घारापुरी विद्युतीकरणाचे वर्णन “विकासाच्या काळाची नवीन सुरुवात” असे केले.
Elephanta Caves
  • सौभाग्य योजना: गरीबांच्या चेहऱ्यावर हास्य फुलविणारी सौभाग्य योजना महाराष्ट्रात 10 ऑक्टोबर 2017 पासून सौभाग्य योजनेला सुरूवात करण्यात आली. सौभाग्य योजनेमध्ये राज्यातील 12 लाख 56 हजार 288 घरकुलांना वीजजोडण्या देण्यात आल्यात. डिसेंबर -2018 पर्यंत या योजनेतून राज्यातील घरकुलांचे 100 टक्के विद्युतीकरणाचे उद्दीष्ट साध्य करण्यात आले.
 
  • 20,745 मेगावॅट विजेच्या मागणीचा विक्रम ऑक्टोबर हिटच्या तडाख्यामुळे महावितरणच्या कार्यक्षेत्रात विजेच्या मागणीने विक्रमी उच्चांक गाठला होता. दि.23 ऑक्टोबर 2018 रोजी तब्बल 20,745 मेगावॅट ही सर्वाधिक विजेची मागणी नोंदविण्यात आली.

msedcl_logo
Urja
Empowering the Consumer