मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.०

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.०

MSKVY २.० मध्ये नवीन काय आहे

“समुह प्रकल्प” - एक नवीन दृष्टीकोन:

प्रकल्प क्षमता - ०.५ मेगावॅट ते २५ मेगावॅट
कनेक्शन पातळी (व्होल्टेज) - ११ केव्ही
३३ केव्ही
उत्पादन आधारित प्रोत्साहन - ११ केव्ही: २५ पैसे प्रति युनिट
३३ केव्ही: १५ पैसे प्रति युनिट
(तीन वर्षांसाठी)
खालील अटींच्या अधीन राहून:
  1. वीज खरेदी करार (PPA) डिसेंबर २०२४ पूर्वी
  2. १२ महिन्यांच्या आता प्रकल्प पूर्ण करणे आवश्यक

सौर ऊर्जा प्रकल्पासाठी दिल्या जाणाऱ्या खाजगी जमिनीसाठी वाढीव मोबदला (भाडे):

  • रेडी रेकनर दराच्या ६ % किंवा १, २५, ००० /- प्रति हेक्टर प्रति वर्ष, यापैकी जे जास्त असेल ते भाडे जमीन मालकाला मिळेल
  • मूळ भाडेपट्टीवर वार्षिक ३% वाढीची तरतूद

जमीनीसंबंधित समस्या सोडविण्यासाठी धोरण:

  • प्रकल्पाची अंमलबजावणी SPV गठीत करून
  • SPV द्वारे जमीन भाड्याने घेतली जाणार
  • ना हरकत दाखले (NOC) SPV द्वारे घेतले जाणार
  • ४५ दिवसांची राज्यव्यापी जमीन शोध मोहीम
  • जिल्हाधिकाऱ्यांचा सक्रिय सहभाग

आयटी (IT) प्लॅटफॉर्मचा वापर

  • माहितीच्या निरंतर आदानप्रदानासाठी विशेष API लिंकेजचा वापर
  • डिजिटल नकाशांवर सौर प्रकल्पांसाठी योग्य जमिनी शोधणे
  • PM गति-शक्ती पोर्टलद्वारे जमिनीची व्यवहार्यता तपासणे