मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.०

मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना - २.०

मु.सौ.कृ.वा.यो. २.० ची ठळक वैशिष्ट्ये
वैशिष्ट्य तपशील
भागधारकांसाठी प्रमुख प्रोत्साहने
  1. लवकर कार्यान्वित होणार्या प्रकल्पांसाठी वीज खरेदी करार (PPA) कालावधी हा पूर्वमान्य (deemed extension) असेल
  2. हरित उपकर निधीमधून रु. २५ लाख प्रति सबस्टेशन इतके एकरकमी अनुदान
  3. खाजगी जमीन मालक आणि शेतकर्यांसाठी रु. १,२५,००० प्रति हेक्टरी प्रमाणे जमीन भाडेपट्टी, वार्षिक ३% दरवाढीसह
  4. स्थानिक ग्रामपंचायतीसाठी रु. ५ लाख प्रति वर्ष प्रमाणे तीन वर्षांसाठी प्रोत्साहनपर अनुदान
  5. ११ केव्ही आणि ३३ केव्ही वर जोडलेल्या सौर प्रकल्पांना अनुक्रमे २५ पैसे प्रति युनिट आणि १५ पैसे प्रति युनिट प्रमाणे तीन वर्षांसाठी अनुदान
  6. हंगामी वीज निर्मितीच्या निर्देशकांनुसार deemed generation साठी 100% प्रचलित दर लागू
  7. एका पेक्षा जास्त प्रकल्पांसाठी सामायिक Evacuation वाहिनीची तरतूद
नाविन्यपूर्ण व्यवहार संरचना
  1. महसुली जमिनीसाठी स्वतंत्र कंपनी (SPV)
  2. खाजगी आणि महसुली जमिनीचे एकत्रीकरण
  3. बॅक-टू-बॅक लीज-सबलीज; PPA-PSA व्यवस्था
  4. कार्यक्रमासाठी समर्पित नोडल एजन्सी
योजना जोखीम मुक्त करण्यासाठी उपाय
  1. डेटा-रूम, GIS स्तरावर जमिनीचा तपशील
  2. एक खिडकी मंजुरी यंत्रणा
  3. कृषी वापरावर आधारित प्रकल्प क्षमता निर्धारित; CFA चा लाभ घेण्यासाठी ह्या योजनेतील वीज प्रकल्प KUSUM - C योजनेशी संलग्नित
  4. देयक सुरक्षा निधी (Revolving Fund), लेटर ऑफ क्रेडिट (LC)