Skip to main content

Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

पुण्यश्लोक
मेनू

भाषा -

मेनू

श्री. राजिब साहू

( स्वतंत्र संचालक )

Shri. Rajib Sekhar Sahoo

श्री. राजिब साहू

श्री. राजिब साहू हे कार्यरत सनदी लेखापाल आणि ‘एसआरबी अँड असोसिएट्स’ (SRB & Associates) चे प्रमुख भागीदार आहेत. सध्या ते इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स चे अध्यक्ष आहेत. ते ओडिशा स्टेट सिव्हिल सप्लाइज कॉर्पोरेशन लि. चे संचालक आहेत. ते गुंतवणूकदार शिक्षण आणि संरक्षण निधी प्राधिकरण (IEPF) चे सदस्य तसेच लक्ष्मणराव इनामदार नॅशनल अकादमी फॉर को-ऑपरेटिव्ह रिसर्च डेव्हलपमेंट चे सदस्य आहेत. ते भारत सरकारने नियुक्त केलेल्या कंपनी कायदा स्थायी समितीचे (Company Law Standing Committee) सदस्य आणि CARO पुनरावलोकन समितीचे (CARO Review Committee) सदस्य आहेत. ओडिशा सरकारने नियुक्त केलेले ते ओडिशा अर्बन इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट फंड चे स्वतंत्र विश्वस्त आहेत. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार स्थापन झालेल्या आणि निवृत्त उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या अध्यक्षतेखालील ओडिशातील व्यावसायिक शिक्षण संस्थांच्या शुल्क संरचना समितीचे (Fee Structure Committee) ते २००७ पासून सदस्य आहेत. ओडिशा सरकारने नियुक्त केलेल्या श्री जगन्नाथ मंदिर, पुरी येथील रत्नभांडारात साठवलेल्या दागिन्यांसह मौल्यवान वस्तूंच्या मोजदादीच्या (इन्व्हेंटरायझेशन) प्रक्रियेवर देखरेख ठेवणाऱ्या उच्चस्तरीय समितीचेही ते सदस्य आहेत. तसेच ते ओडिशा सरकारने स्थापन केलेल्या ओडिशा टेक्निकल अँड फायनान्शियल असेसमेंट ग्रुप या समितीचे सदस्य आहेत.

ते २००८ ते २०१० या काळात पारादीप पोर्ट ट्रस्टचे विश्वस्त होते. जुलै २००८ ते जुलै २०११ या काळात ते आंध्रा बँकेचे संचालक होते. ते ऑगस्ट २०११ ते ऑगस्ट २०१४ या काळात भारत सरकारच्या नवरत्न/महारत्न कंपनी असलेल्या एनटीपीसी लिमिटेडचे संचालक होते. ऑक्टोबर २०११ ते ऑक्टोबर २०१४ या काळात हिंदुस्तान झिंक लिमिटेडचे, नोव्हेंबर २०११ ते नोव्हेंबर २०१४ या काळात टीएचडीसी इंडिया लिमिटेडचे (टेहरी हायड्रो डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन इंडिया लिमिटेड), डिसेंबर २०११ ते डिसेंबर २०१४ या काळात बँक ऑफ बडोदाचे संचालक होते. तसेच ते इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेडचे स्वतंत्र संचालक, सिकॉम लिमिटेडचे स्वतंत्र संचालक आणि कलिंगा हॉस्पिटल्स लिमिटेडचे स्वतंत्र संचालक होते. २०१४-१५ या परिषद वर्षासाठी ते आयसीएआयच्या (ICAI) बँकिंग, विमा आणि निवृत्ती वेतन समितीचे सह-नियुक्त सदस्य होते. सिलिकॉन व्हॅली, अमेरिका येथे मुख्यालय असलेल्या ‘द इंडस एंटरप्रेन्युअर’ (TlE) च्या भुवनेश्वर शाखेचे ते अध्यक्ष होते.

msedcl_logo
Urja

Empowering the Consumer