Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.
मुंबई, दि. ०३ सप्टेंबर २०२५: महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक मा. लोकेश चंद्र यांना इंग्लंडच्या ‘वर्ल्ड रेकॉर्ड ऑफ एक्सलन्स’ तर्फे ऊर्जा क्षेत्रातील भरीव कामगिरीबद्दल नुकताच एनर्जी लीडरशिप अवॉर्ड २०२५’ प्रदान करण्यात आला.




महावितरणला सार्वजनिक धोरण आणि सुशासन यावर महत्व केंद्रित करणारे प्रतिष्ठित प्रकाशन गव्हर्नन्स नाऊ कडून दोन विभिन्न श्रेणींमध्ये प्रतिष्ठित राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. हा पुरस्कार समारंभ 7 डिसेंबर 2023 रोजी नवी दिल्ली येथे संपन्न झाला. महावितरणला माहिती तंत्रज्ञानाचा अप्रतिम वापर, ग्राहकांना सेवा देण्यासाठी आणि माहिती विश्लेषणाद्वारे धोरणात्मक निर्णय घेण्याची सुविधा या दोन्हीसाठी ही मान्यता देण्यात आली. या उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री लोकेश चंद्रा आणि संचालक (संचलन) श्री संजय ताकसांडे यांनी कंपनीच्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे अभिनंदन केले.
‘ईव्ही चार्ज इंडिया २०२३’ या नवी दिल्ली येथे आयोजित इलेक्ट्रिक वाहनांविषयीच्या परिषदेत महावितरणला चार्जिंगसाठी पायाभूत सुविधांच्या विकासात सर्वोत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल पुरस्कार देण्यात आला. महावितरणचे संचालक श्री. प्रसाद रेशमे यांनी हा पुरस्कार स्वीकारला.
‘इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (आयपीपीआयए)’ या वीज क्षेत्रातील अग्रगण्य संस्थेचा देशातील सर्वोत्कृष्ट वीज वितरण कंपनीचा पुरस्कार महावितरणला मिळाला असून याखेरीज ग्राहक जागृती, माहिती तंत्रज्ञानाचा कल्पक वापर आणि विजेच्या मीटरसाठी आधुनिक रेडिओ फ्रिक्वेन्सी तंत्रज्ञानाचा वापर केल्याबद्दल अन्य पुरस्कार मिळाले.
इलेक्ट्रिक वाहनधारकांची गाड्यांच्या चार्जिंगची समस्या सोडविण्यासाठी विकसित केलेल्या सुविधेसाठी महावितरणला ‘आयएसजीएफ इनोव्हेशन ॲवॉर्ड २०२३’ हा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. महावितरणचे संचालक प्रसाद रेशमे यांनी शुक्रवारी सायंकाळी नवी दिल्ली येथे एका समारंभात हा पुरस्कार स्वीकारला. या यशाबद्दल महावितरणचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी कंपनीच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचे अभिनंदन केले.
हे ॲप मराठी व इंग्रजी दोन्ही भाषांमध्ये काम करते. महावितरणला केंद्रीय पद्धतीने सर्व चार्जिंग स्टेशन्सवर देखरेख ठेवणे शक्य होते. आतापर्यंत या ॲप्लिकेशनवर २५०० खासगी व महावितरणची चार्जिंग स्टेशन्स जोडली गेली आहेत. यापूर्वी आत्मनिर्भर भारत शिखर परिषद स्कोच २०२२ पुरस्काराने या प्रकल्पाचा सन्मान झाला आहे.
घराच्या छतावर सौरऊर्जा निर्मिती पॅनेल्स बसवून वीजनिर्मिती करण्याच्या ‘रूफ टॉप सोलर’ योजनेतील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणला इंडियन चेंबर ऑफ कॉमर्स या संस्थेने विजेता जाहीर केले असून नवी दिल्ली येथे पुरस्कार प्रदान करण्यात आला.
सौरऊर्जा निर्मितीसाठी रूफ टॉप सोलर योजनेत ग्राहकांना केंद्र सरकारकडून मोठे अनुदान मिळते. सौरऊर्जेतून निर्माण होणाऱ्या वीजेमुळे ग्राहकाला नेहमीचा वीजपुरवठा कमी वापरावा लागतो व वीजबिलात कपात होते. ग्राहकाच्या सौर पॅनेलमधून त्याच्या वापरापेक्षा जास्त वीज निर्माण झाली तर ती महावितरणच्या ग्रीडमध्ये पाठवली जाते व कंपनी त्या विजेच्या मोबदल्यात वीजबिलात सवलत देते. सोलर पॅनेल बसविण्याचा खर्च चार ते पाच वर्षांत भरून निघतो पण त्यांचा उपयोग पंचवीस वर्षे होत राहतो. यामुळे ही योजना लोकप्रिय झाली आहे. या योजनेमुळे वीजबिलात बचत होण्यासोबत पर्यावरण रक्षणाला मदत होते. घरगुती ग्राहकांप्रमाणे औद्योगिक ग्राहकही रुफ टॉप सोलर पद्धतीने वीजनिर्मिती करत आहेत. सौर ऊर्जानिर्मितीसाठी पॅनेल बसवू इच्छिणाऱ्या ग्राहकांना
देशातील सर्वोत्तम कामगिरीसाठी स्कॉच संस्थेतर्फे दिला जाणारा प्रथम पुरस्कार मिळाल्याने राज्य शासनाच्या ऊर्जा विभागाने शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे. या पुरस्काराबद्दल मा.मुख्यमंत्री श्री.उद्धव ठाकरे यांनी मा.ऊर्जा मंत्री डॉ. नितीन राऊत यांचे तर मा.ऊर्जा मंत्री डॉ. राऊत यांनी ऊर्जा विभागातील सर्व अधिकारी व कर्मचारी यांचे अभिनंदन केले आहे. ऊर्जा विभागाअंतर्गत येणाऱ्या कंपनीने केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबाबत ‘स्टार ऑफ गव्हर्नन्स स्कॉच अवार्ड इन पॉवर ॲण्ड एनर्जी’ या पुरस्काराने गौरविण्यात आले आहे. ही महाराष्ट्राच्या द्दष्टीने अतिशय अभिमानास्पद कामगिरी आहे.
‘एचव्हीडीसी योजने’अंतर्गत एकूण १ लाख २९ हजार ५४६ कृषीपंप ऊर्जान्वित झाले. ‘मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेअंतर्गत एकूण ९९ हजार ७४४ कृषीपंप बसविण्यात आले. एप्रिल २०२१ पासून सुरू झालेल्या ‘डॉ.बाबासाहेब आंबेडकर जीवन प्रकाश योजने’अंतर्गत अनुसूचित जाती, जमाती व भटक्या विमुक्त घटकांसाठी सुमारे १२ हजार १०२ घरगुती वीजजोडणी देण्यात आली. तसेच एप्रिल महिन्यात राज्यात वीज संकट निर्माण झाले असतांना विक्रमी वीजनिर्मिती करून राज्यातील जनतेला भारनियमनमुक्त ठेवण्यात महत्वपूर्ण योगदान कंपनीने दिले आहे.
महावितरणला डिजिटल इनोव्हेशन इनिशिएटिव्ह (ट्रान्सपोर्ट आणि मोबिलिटी) श्रेणी अंतर्गत त्याच्या EV उपक्रमांसाठी प्रतिष्ठित Elets इनोव्हेशन पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत.वीज वितरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल महावितरणला इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (IPPAI) द्वारे सहा राष्ट्रीय पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. शनिवारी (9 रोजी) बेळगाव (कर्नाटक) येथे आयोजित ‘पॉवर अवॉर्ड 2022’ कार्यक्रमात ऊर्जा मंत्रालयाचे सहसचिव (GoI), श्री. घनश्याम प्रसाद यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
ग्राहकाभिमुख सेवा, नावीन्य, तंत्रज्ञानाचा वापर या श्रेणींमध्ये देशातील विविध वीज वितरण कंपन्यांच्या कामगिरीचे मूल्यमापन करण्यासाठी इंडिपेंडंट पॉवर प्रोड्युसर्स असोसिएशन ऑफ इंडिया (IPPAI) द्वारे पॉवर अवॉर्ड 2022 जाहीर करण्यात आला आहे. महावितरणला सर्वाधिक पुरस्कार मिळाले आहेत.
नवनवीन संकल्पनांचा प्रभावी वापर, महावितरणच्या ग्राहकांना उच्चदर्जाची सेवा मिळावी व त्याकरिता आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे वापर करून वीजहानी कमी करण्याचे यशस्वी प्रयत्न करणे या निकषांवर महाराष्ट्राची ‘बेस्ट स्टेट युटीलिटी’ पुरस्काराकरिता प्रथम क्रमांकाने तर ‘गुणवत्ता सुधार’ या वर्गवारीत महावितरणची तृतीय क्रमांकाच्या पुरस्कारासाठी निवड करण्यात आली. १५ व्या इंडिया एनर्जी समिटमध्ये देशभरातील २९ वीज वितरण कंपन्यांनमधून विविध निकषांच्या आधारे हे पुरस्कार देण्यात आले. ऑनलाईन संपन्न झालेल्या या कार्यक्रमात महावितरणच्या वतीने संचालक(प्रकल्प) श्री. भालचंद्र खंडाईत यांनी हा पुरस्कार स्वीकारला. इंडियन चेबर ऑफ कॉमर्सच्यावतीने जानेवारी महिन्यात या परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. या परिषदेत भारताचे माजी मुख्य ऊर्जा सचिव श्री. अनिल राजदान यांच्या अध्यक्षतेखालील समितीने पुरस्काराची निवड केली. महाराष्ट्र राज्याचा भौगोलिकदृष्ट्या विचार करता महावितरण ही अत्यंत कठीण परिस्थितीतही चांगले काम करत असल्याचे गौरव उद्गार श्री. अनिल राजदान यांनी काढले. महावितरणला हा सन्मान म्हणजे अधिकारी-कर्मचारी यांच्या सांघिक प्रयत्ना चे फलित आहे. ग्राहकसेवेचे हे व्रत असेच जोपासत त्यात गुणात्मक वाढ करण्याचा मानस यावेळी महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय सिंघल यांनी या पुरस्कारकाच्या निमित्ताने व्यक्त केला. महावितरणने महाराष्ट्र राज्यात गेल्या काही वर्षात पायाभूत सुविधा व वीज यंत्रणा मोठ्या प्रमाणावर उभारण्यात यशस्वी ठरली आहे. महावितरणने आपल्या दैनंदिन कामकाजात आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात वाढविला असून यामुळे ग्राहकांना वीजबिल भरणे, नवीन वीजजोडणी घेणे, मीटर रीडिंग पाठवणे, तक्रार नोंदणी करणे अशा अनेक सुविधा एका क्लिकवर उपलब्ध झाल्या आहेत. ईआरपी प्रणालीमुळे महावितरणच्या कामात अधिक पारदर्शकता व गतिशीलता आली आहे. येत्या काही वर्षात महावितरणकडून स्मार्ट मीटरचा वापर मोठ्या प्रमाणात करण्यात येणार आहे.
केंद्रीय ऊर्जा मंत्रालय व इंडीयन चेंबर ऑफ़ कॉमर्सच्यावतीने आयोजित १३ व्या इंडियन एनर्जी समिटमध्ये ऊर्जा क्षेत्रातील प्रभावी कामगिरीबद्दल महावितरणला देशपातळीवर मानाचा तृतिय क्रमांकाचा एफ़िशियंट ऑपरेशन (नेटवर्क एफ़िशिएन्सी, डीएसएम) पुरस्कार – वीज यंत्रणेचे प्रभावी जाळ आणि वीजेच्या मागणीचे प्रभावी व्यवस्थापन याकरिता पुरस्काराने गौरविण्यात आले.
हरित ऊर्जा क्षेत्रात दिलेल्या प्रभावी योगदानासाठी तृतिय क्रमांकाचा ग्रीन एनर्जी (आरई उपक्रम, आरपीओ, सोलर रूफटॉप, ईव्ही, एनर्जी स्टोरेज) पुरस्कार – नवीन व नविकरणीय ऊर्जा क्षेत्र, नवीकरणीय वीज खरेदीचे दायित्व, छतावरील सौर ऊर्जानिर्मिती, विद्युत वाहने चार्जिंग केंद्रासाठी महावितरणने आखलेले धोरण व त्याची अंमलबजावणी आणि विजेची साठवणूक या क्षेत्रात महावितरणने केलेल्या उल्लेखनिय कार्यासाठी महावितरणला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
नवनवीन उपक्रमांना अंगिकारीत त्यांचा झालेला प्रभाव यासाठीचा प्रतिष्ठित तृतिय क्रमांकाचा इनोव्हेशन विथ इम्पेक्ट (सामान्य राज्ये) पुरस्कार – नवनविन तंत्रज्ञानाचा अवलंब करीत त्याच्या प्रभावी वापरासोबतच ग्राहकांना या नाविन्यपुर्ण तंत्रज्ञानाचा वापर करण्याप्रती जागृत करण्यासाठी महावितरणने प्रभावीपणे राबविलेल्या विविध उपक्रमांसाठी महावितरणला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.



अकोला शहरात उपकेंद्र देखरेख प्रणाली (Substation Monitoring System) लागू केल्याबद्दल एम. एस. ई. डी. सी. एल. ला ‘स्कोच ऑर्डर-ऑफ-मेरिट 2018 पुरस्कार’ देखील प्रदान करण्यात आला आहे. ही प्रणाली सर्किट ब्रेकर, ट्रान्सफॉर्मर, फीडर आणि डीसी बॅटरी प्रणाली यांसारख्या विविध उपकेंद्र उपकरणांसाठी थेट डेटा उपलब्ध करून देते, ज्यामुळे वीज वितरण प्रणालीच्या कार्यान्वयन, धोरणात्मक आणि नियोजनाबाबत योग्य निर्णय घेण्यास मदत करणाऱ्या विविध विश्लेषणाचे कार्य सुलभ होते.
एम. एस. ई. डी. सी. एल. ला देखील सन्मानित करण्यात आले आहेस्कोच ऑर्डर ऑफ मेरिट 2018यासाठी पुरस्कारएम. एस. ई. डी. सी. एल. ग्राहक सेवा उपक्रम, जसे की त्याच्या सर्वांसाठी केंद्रीकृत ग्राहक सेवा केंद्रे. ग्राहक, 2 कोटींहून अधिक नोंदणीकृत ग्राहकांना एस. एम. एस. च्या माध्यमातून विविध मीटर वाचन आणि बिलिंग सूचना पाठवतात आणि ट्विटर आणि फेसबुकसारख्या सामाजिक माध्यमांद्वारे ग्राहकांच्या तक्रारींचे निराकरण करतात.
एम. एस. ई. डी. सी. एल. ला देखील सन्मानित करण्यात आले आहेस्कोच ऑर्डर ऑफ मेरिट 2018अंमलबजावणीसाठी पुरस्कारउपकेंद्र देखरेख प्रणालीअकोला शहरात. ही प्रणाली सर्किट ब्रेकर, ट्रान्सफॉर्मर, फीडर आणि डी. सी. बॅटरी प्रणाली यासारख्या विविध उपकेंद्र उपकरणांसाठी थेट माहितीची उपलब्धता सक्षम करते, जी विद्युत वितरण प्रणालीच्या परिचालन, धोरणात्मक आणि नियोजनाच्या संदर्भात योग्य निर्णय घेण्यास मदत करणारे विविध विश्लेषण करणे सुलभ करते.
स्कॉच ऑर्डर ऑफ मेरिट पुरस्कार – मोबाईल एप्स आणि डॅशबोर्डसाठी
भारतीय स्मार्ट ग्रीड मंच (आय. एस. जी. एफ.) नवोन्मेष पुरस्कार – भारतातील आर-ए. पी. डी. आर. पी. भाग ‘अ’ अंमलबजावणीसाठी सर्वोत्तम उपयुक्तता.
चॅम्पियन ऑफ चेंज पुरस्कार-2017 – कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय, भारत सरकार.
सर्वात नाविन्यपूर्ण डिस्कॉम इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या डिस्कॉम्ससाठीच्या 5 व्या इनोव्हेशन विथ इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये 2017 या वर्षासाठी.
एम. एस. ई. डी. सी. एल. चे नाविन्यपूर्ण उपक्रम खालीलप्रमाणे आहेतः
एम. एस. ई. डी. सी. एल. ने ग्राहकांसाठी महावितरण मोबाईल ऍप्लिकेशन विकसित केले आहे जे ग्राहकांना नवीन जोडणीसाठीसाठी अर्ज, बिल भरणे, नावात बदल आणि तक्रार नोंदणी यासह विविध सुविधा प्रदान करते.
एम. एस. ई. डी. सी. एल. ने आपल्या कर्मचाऱ्यांसाठी मोबाईल अॅप्स देखील विकसित केले आहेत जे त्यांच्या कर्मचाऱ्यांना मीटर रीडिंग घेण्यास, आउटेज व्यवस्थापन, डिस्कनेक्शन्स आणि रिकव्हरी ड्राइव्ह, लोड व्यवस्थापन, फीडर वाचन, पी. डी. पडताळणी तक्रार निराकरण इत्यादी दैनंदिन क्षेत्रीय उपक्रम पार पाडण्यास सक्षम करतात.
एम. एस. ई. डी. सी. एल. ने विश्लेषणात्मक डॅशबोर्ड सादर केला आहे जो उच्च अधिकाऱ्यांना त्वरित डेटा विश्लेषण प्रदान करतो आणि त्यांना योग्य निर्णय घेण्यास मदत करतो ज्यामध्ये नवीन सेवा जोडणी, देय प्रलंबित, बिलिंग, देयके-ऑफलाईन/ऑनलाइन, थकबाकी वसुली/स्थिती, भार प्रोफाइल, सी. आर. एम.-तक्रार देखरेख, प्रकल्प देखरेख, ऊर्जा लेखापरीक्षण यासारखी वैशिष्ट्ये आहेत. गेल्या 3 वर्षांच्या आकडेवारीचे विश्लेषण आणि तुलना केली जाऊ शकते.
एम. एस. ई. डी. सी. एल. ने आपल्या दैनंदिन कामकाजात एस. ए. पी. ई. आर. पी. उपाय आणि वित्त, परिचालन आणि प्रकल्प कार्यांसाठी विविध प्रणालींसह एकत्रीकरण लागू केले आहे.
त्याचप्रमाणे यासाठी नवीन नाविन्यपूर्ण अनुप्रयोग विकसित केले जातात,
ग्रीन ग्रीड पुरस्कार श्रेणी अंतर्गत दुसरा पुरस्कार इंडियन चेंबर ऑफ कॉमर्सच्या डिस्कॉम्ससाठी 5 व्या इनोव्हेशन विथ इम्पॅक्ट अवॉर्ड्समध्ये.
ऊर्जा कार्यक्षमता आणि हरित ऊर्जा उपक्रमः
एम. एस. ई. डी. सी. एल. ने ग्राहक जागरूकता उपक्रम हाती घेतले आहेत ऊर्जा कार्यक्षमता रॅली, शाळा आणि सार्वजनिक ठिकाणी चर्चासत्र, पत्रकांचे वितरण, बॅनर आणि होर्डिंग्ज लावणे, कार्यशाळा घेणे आणि त्यांच्या वृत्तपत्राद्वारे प्रसारमाध्यमांमध्ये जागरूकता निर्माण करणे, शाळांमधील गुणवंत विद्यार्थ्यांना प्रशंसा पुरस्कार म्हणून एलईडी बल्बचे वितरण करणे. एम. एस. ई. डी. सी. एल. ने डी. ई. एल. पी. (घरगुती कार्यक्षम प्रकाश कार्यक्रम) सुरू केला आहे ज्यामध्ये त्यांनी एल. ई. डी. बल्बचे वितरण केले आहे. मागणी बाजूच्या व्यवस्थापन उपक्रमांवर एम. एस. ई. डी. सी. एल. ने 7.6 कोटी रुपये खर्च केले आहेत.
एकूण ग्राहकांच्या तुलनेत ऊर्जा कार्यक्षम उपक्रमांची व्याप्तीः
1) 1 कोटी 75 लाख देशांतर्गत ग्राहकांपैकी 40 लाख देशांतर्गत ग्राहकांनी डी. ई. एल. पी. योजनेत एल. ई. डी. चा लाभ घेतला.
2) आय. डी. 1 लाख ए. जी. ग्राहकांपैकी 2209 ए. जी. ग्राहकांना स्टार रेटेड पंपचा फायदा झाला आहे.
3) 1740 ए. जी. ग्राहकांना सौर पंपामुळे फायदा झाला.
अक्षय ऊर्जाः
एम. एस. ई. डी. सी. एल. ने नवीकरणीय खरेदी दायित्व पूर्ण करण्यासाठी मोठे प्रयत्न केले आहेत, जे देशात सर्वाधिक आहे.
एम. एस. ई. डी. सी. एल. ने राज्य नियामक आयोग, एम. ई. आर. सी. द्वारे वेळोवेळी अधिसूचित केलेले सोलर रूफ टॉप धोरण/नियमन स्वीकारले आहे.
पीक लोड व्यवस्थापन आणि लोड रिडक्शन कार्यक्रमः
| डी. एस. एम कार्यक्रम | स्थापनेची संख्या |
|---|---|
| डी. एल. पी | 2. 13 कोटी |
| एजी पंप संच डी. एस. एम | 2209 |
| कमाल मर्यादेचे चाहते | 4998 |
| एचव्हीएसी योजना | 20000 पंखे/15 एचव्हीएसी चिलर रिप्लेसमेंट आणि 15 एचव्हीएसी चिलर रेट्रोफिटिंग |
महावितरणला क्षमता बांधणी आणि प्रशिक्षणात उत्कृष्टता साठी सी. बी. आय. पी. पुरस्कार
महावितरणच्या मोबाईल ॲप्ससाठी ‘एक्सप्रेस इंटेलिजंट पीएसयू पुरस्कार 2016 देऊन सन्मानित करण्यात आले.
10 व्या इंडियन एनर्जी समिट 2016 मध्ये ‘सर्वोत्कृष्ट वीज युटिलिटी पुरस्कार’ देऊन सन्मानित करण्यात आले.
ऊर्जा मंत्रालय आणि भारतीय वाणिज्य मंडळ यांनी नवी दिल्ली येथे आयोजित केलेल्या राष्ट्रीय ऊर्जा परिषदेमध्ये महावितरणला सर्वोत्कृष्ट राज्य ऊर्जा उपयुक्तता पुरस्कार आणि ग्रीन ग्रीड पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.
ऊर्जा संवर्धन (Energy Conservation) क्षेत्रात दिलेल्या भरीव योगदानाबद्दल महावितरणला (MSEDCL) केंद्रीय ऊर्जा मंत्रालयाने आयोजित केलेला ‘राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन पुरस्कार 2014’ (The National Energy Conservation Award 2014) देऊन सन्मानित करण्यात आले.
वर्ल्ड एचआरडी काँग्रेस 2014 (World HRD Congress 2014) द्वारे महावितरणला ‘वर्षातील सर्वोत्कृष्ट नियोक्ता’ (Best Employer of the year) आणि ‘सर्वोत्कृष्ट संस्था आणि कर्मचारी विकास’ (Best Organisation and Staff Development) या पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले.
महावितरणला (MSEDCL) ‘आशिया पॅसिफिक एचआरएम पुरस्कार 2014’ (Asia Pacific HRM Award 2014) प्रदान करण्यात आला.