Maharashtra State Electricity Distribution Co. Ltd.

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित

(महाराष्ट्र शासन उपक्रम)

मिस्ड कॉल सेवा

०२२५०८९७१००

राष्ट्रीय टोल-फ्री

१९१२/१९१२०

महावितरण टोल-फ्री

१८००-२३३-३४३५ / १८००-२१२-३४३५

श्री. राजेंद्र वि. पवार

संचालक (मानव संसाधन)

महावितरण कंपनीचे संचालक (मानव संसाधन) म्हणून राजेंद्र पवार यांची  थेट भरती प्रक्रियेतून निवड झाली आहे.

महावितरणमधील सेवेचा ३६ वर्षांचा अनुभव असणारे नवनियुक्त संचालक (मानव संसाधन) . राजेंद्र पवार हे मूळचे भऊर (ता. देवळा, जि. नाशिक) येथील रहिवासी आहे. त्यांनी विद्युत अभियांत्रिकी पदवी पुणे शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातून (सीओईपी) विशेष प्रावीण्यासह प्राप्त केली आहे. त्यानंतर १९८९ मध्ये तत्कालिन म. रा. विद्युत मंडळात कनिष्ठ अभियंता म्हणून वाशी (ता. पेण) येथे रूजू झाले. त्यानंतर पदोन्नतीवर त्यांनी सहायक अभियंता, उपकार्यकारी अभियंता पदी काम केले आहे. सन २०११ मध्ये थेट भरती प्रक्रियेमधून त्यांची कार्यकारी अभियंता पदी निवड झाली. या काळात त्यांनी पेण, कळवण, नाशिक, पनवेल, कल्याण येथे काम केले आहे. तसेच अधीक्षक अभियंता म्हणून नागपूर व पुणे येथे काम केले आहे. तर गेल्या सव्वादोन वर्षांपासून  पवार पुणे परिमंडलाचे मुख्य अभियंता म्हणून कार्यरत होते.

 संचालक (मानव संसाधन). राजेंद्र पवार यांनी याआधीच्या सेवेत लोकाभिमुख प्रशासन, ग्राहकसेवा आणि मानव संसाधन व्यवस्थापनात उल्लेखनीय कामगिरी केली आहे. पुणे परिमंडलामध्ये मुख्य अभियंता म्हणून त्यांनी महसूलवाढ, नवीन वीजजोडण्या, छतावरील सौर ऊर्जा प्रकल्पांमध्ये विक्रमी कामगिरी केली आहे. सोबतच कर्मचारी प्रशिक्षण व कार्यशाळा, कर्मचारी प्रोत्साहनपर विविध उपक्रम, कर्मचारीपाल्यांची अनुकंपा तत्त्वावरील भरती प्रक्रिया आदींना मोठा वेग दिला. त्यांच्या नेतृत्वात प्रशिक्षण व विविध उपक्रमांमुळे पुणे लघु प्रशिक्षण केंद्राला सलग तीन वर्ष राज्यात प्रथम क्रमांक मिळाला आहे. त्यापूर्वी पवार यांनी स्वतः ‘ऑन फिल्ड’ राहून मुंबईचा महापूर, पुण्यातील ‘तौक्ते’, ‘निसर्ग’ चक्रीवादळे, ‘कोरोना’ आदी संकटांमध्ये आपत्ती व्यवस्थापनाचे नेतृत्व केले आहे.

Urja
Empowering the Consumer