श्री जयंत श्रीनिवास कावळे (वय ७०) हे भारतीय प्रशासकीय सेवेच्या (IAS) १९८१ च्या बॅचचे अधिकारी होते.
लातूर आणि नागपूर जिल्ह्यांचे जिल्हाधिकारी, उद्योग विकास आयुक्त, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी, ऊर्जा सचिव आणि तत्कालीन महाराष्ट्र राज्य वीज मंडळाचे त्रिभाजन होण्यापूर्वी ते शेवटचे अध्यक्ष होते. तसेच भारत सरकारच्या ऊर्जा मंत्रालयात सहसचिवसह विविध पदांवर त्यांनी काम केले आहे.
सुमारे २८ वर्षे शासकीय सेवा केल्यानंतर श्री कावळे यांनी खाजगी क्षेत्रात प्रवेश केला आणि जिंदाल स्टील अँड पॉवर आणि रतनइंडिया पॉवर यांसह अनेक कंपन्यांमध्ये काम केले.
अशाप्रकारे, श्री कावळे यांना महाराष्ट्र राज्य, भारत सरकार तसेच खाजगी क्षेत्रात विविध पदांवर ऊर्जा क्षेत्राचा सुमारे १५ वर्षांचा अनुभव आहे.