लाभार्थी निवडीचे पात्रता निकष – (३ व ५ अश्वशक्ती ) :

  • शेतकऱ्याकडे शाश्वत जलस्त्रोत असलेली शेतजमीन असणे.
  • पारंपारिक पध्दतीने कृषीपंपाकरिता विदयुत जोडणी न झालेले शेतकरी.
  • ५ एकरापर्यंत शेतजमीन धारकास ३ अश्वशक्ती सौर कृषीपंप व ५ एकरापेक्षा जास्त शेतजमीन धारकास ५ अश्वशक्ती व ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप देय असेल.
  • यापुर्वी शासनाच्या कुठल्याही योजनेद्वारे कृषीपंपाचा लाभ न घेतलेले शेतकरी.
  • अतिदुर्गम व आदिवासी भागातील शेतकऱ्यास प्राधान्य.
  • वन विभागाचे ना हरकत प्रमाणपत्र मिळत नसल्याने अद्याप विदयुतीकरण न झालेल्या गावातील शेतकरी.
  • “धडक सिंचन योजना” अंतर्गत लाभ घेतलेले शेतकरी.
  • महावितरणकडे विदयुत जोडणीसाठी पैसे भरुन प्रलंबित असलेले शेतकरीअर्जदार.

लाभार्थी निवडीचे पात्रता निकष ७.५ अश्वशक्ती सौर कृषीपंप करिता:

  • विहिर किंवा कूपनलीका यापैकी जलस्त्रोत असणे आवश्यक आहे.
  • अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार अतिशोषित, शोषीत आणि अंशत: शोषीत क्षेत्रामधील (गावांमधील) विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार नाही.
  • अद्यावत भूजल अंदाज अहवालानुसार ज्या सुरक्षीत पाणालोट क्षेत्रांची उपशाची स्थिती (stage of extraction) ६० टक्के पेक्षा कमी आहे, अशा क्षेत्रातील गावांमधील विहीरींमध्ये व कूपनलीकांमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र.
  • खडकाचे क्षेत्रात खोदल्या जाणा-या विंधन विहीरी हे शाश्वत सिंचनाचे साधन नसल्यामुळे विंधन विहीरींमध्ये (Bore well), नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय आसणार नाही. मात्र गाळाचे क्षेत्रामध्ये खोदल्या जाणा-या कूप नलिका हे शाश्वत सिंचनाचे साधन असल्यामुळे सुरक्षीत क्षेत्रामधील कूपनलीकांमध्ये (Tube Well) अ.क्र.२ च्या अधीन राहून, नवीन सौर पंप देणे अनुज्ञेय असणार आहे.
  • कोणत्याही वर्गवारीतील क्षेत्रामध्ये ६० मी. पेक्षा जास्त खोल असलेल्या विहीरींमध्ये अथवा कूपनलिकेमध्ये नवीन सौर पंप देण्यास पात्र नाही.

वर्गवारी निहाय लाभार्थी हिस्सा:

वर्गवारी लाभार्थी हिस्सा ३ एचपी लाभार्थी हिस्सा ५ एचपी लाभार्थी हिस्सा ७.५ एचपी लाभार्थी हिस्सा
सर्वसाधारण १०% रु. १६५६०/- रु. २४७१०/- रु. ३३४५५/-
अनुसुचित जाती ५% रु. ८२८०/- रु. १२३५५/- रु. १६७२८/-
अनुसुचित जमाती ५% रु. ८२८०/- रु. १२३५५/- रु. १६७२८/-