जागेचे क्षेत्र फळ कमीत कमी ३ एकर ते जास्तीत जासत् ५० एकर असावे.
महावितरणच्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राजवळील जमिनीला प्राधान्य देण्यात येईल (५ कि.मी.च्या परिघातील).
जमिन अधिग्रहण पर्याय व भाडेपटृटीचे दर:
महसूल विभागाच्या मालकीची व तांब्यातील जागा, सदर जमीन नाममात्र रु.१/- च्या भाडेतत्वावर ३० वर्षासाठी अधिग्रहण करण्यात येईल.
खाजगी तसेच राज्य केंद्र शासनाच्या विविध संस्था, कंपनी महामंडळ, सार्वजनिक उपक्रम, प्रशासकीय विभाग, नागरी व स्थानिक स्वराज्य संस्था, विद्यापीठे इ. (महसूल विभागाच्या मालकीची व ताब्यातल जमीन वगळून) च्या मालकीच्या, सदर जामिनीचा भाडेपट्टी दर रु.३०,०००/- प्रति एकर प्रतिवर्षी इतका असेल व त्यात प्रतिवर्षी ३ टक्के दरवाढ असेल.