महाराष्ट्र शासनाने मुख्यमंत्री सौर कृषि वाहिनी योजना जाहिर केली असून शासन आदेश दि.१४.०६.२०१७ आणि दि.१७.०३.२०१८ रोजी निर्गमित केले आहेत.
सदर योजनेअंतर्गत कृषि भारित वितरण उपकेंद्रापासून ५ कि.मी.च्या परिसरामध्ये ०.५ ते १० मे.वॅ. क्षमतेचे विकेंद्रित सौर ऊर्जा प्रकल्प अस्थापित करून शेतकऱ्यांना दिवस वीज देण्याचे उद्दिष्टे ठेवले आहे.
महाराष्ट्र शासनाने दि. २७.०१.२०२१ रोजी कृषि धोरण जाहिर केले असुन त्यामध्ये लँड बँक पोर्टल समाविष्ट केले आहे.