अर्जदार हे स्वतः शेतकरी, शेतकऱ्यांचा गट, को-ऑपरेटिव सोसायटी, वॉटर युजर असोसिएशन, साखर कारखाने, जल उपसा केंद्र, ग्राम पंचायत व इतर संस्था यापैकी कोणीही असू शकतात.
महावितरणला भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्यां जागेचे क्षेत्रफळ कमीत कमी ३ एकर व जास्तीत जास्त ५० एकर असावे.
होय, जमीन मालकांची संख्या एकापेक्षा जास्त असल्यास त्यांच्यापैकी एका व्यक्तीला नामनिर्देशित करून त्या नावाने आधिकार पत्र (Authorization letter) देणे बधंनकारक राहील.
अर्जदार /अधिकार प्राप्त प्रतिनिधीने (अदयावत - २ महिन्याच्या आतील) सातबारा, ८ अ, फेरफार उताऱ्यांच्या दाखल्याच्या मुळ प्रति संकेतस्थळावर अपलोड कराव्यात
अर्जदाराने पुढील प्रक्रियेसाठी रु.१०,०००/- + १८ % (GST) इतके प्रक्रिया शुल्क भरावे.
महावितरणच्या ३३/११ के.व्ही. उपकेंद्राजवळील जमिनीला प्राधान्य देण्यात यईल (५ कि.मी. आतील).
महावितरणला भाडेतत्वावर देण्यात येणारी प्रस्तावित जमीन ही अतिक्रमण, तारण मुक्त कर्ज मुक्त व इतर कोणत्याही संस्थेचा बोजा मुक्त ही जबाबदारी अर्जदाराची असेल.
महावितरणला भाडेतत्वावर देण्यात येणाऱ्यां प्रस्तावित जमिनीची मोजणी नकाशा प्रमाणे हद्द ठरविणे व निश्चित करणे ही जबाबदारी अर्जदाराची असेल.
महावितरण ला भाडेतत्त्वावर देण्यात येणारी प्रस्तावित जमीन clear title देणे ही जबाबदारी अर्जदाराची असेल
महावितरण कंपनीला भाडेतत्वावर दिलेल्या प्रस्तावित जागेपैकी प्रत्यक्षात हस्तांतरित केलेल्या जागेचाच करारनामा करण्यात येईल.
सदर जमीन शासकीय असल्यास शासन निर्णयानुसार रु.१/- च्या भाडेपट्टीवर ३० वर्षासाठी घेण्यात येईल व खाजगी जमीनी रु.३०,०००/- प्रति एकर (प्रति वर्ष ३ % वाढ) या दराने भाडेतत्वावर घेण्यात येईल.
महावितरण ने जाहीर केलेली उपकेंद्राची यादी ही फक्त कृषि भारीत वाहिनी आधारित आहे.
होय, सौर कृषि वाहिनी साठी कमीत कमी ०३ एकर ते ५० एकर जमिनी ची आवश्यकता आहे,अर्जदाराने जास्त जास्त ५० एकर साठी अर्ज करावा
होय, कालांतराने अर्जदाराला जास्तीत जास्त सहा महिन्या मध्ये भरलेले शुल्क त्यांनी पोर्टल वर नोंद केलेल्या खात्यात परत केले जाईल.
टप्याटप्याने केलेली कार्यवाही एसएमएस द्वारे अर्जदाराला त्यांच्या नोंदणी केलेल्या भ्रमणध्वनी क्रमांकावर वर कळविले जाईल.