धोरणे आणि अस्वीकार

हायपरलिंकिंग बाबतचे धोरण :
बाह्य संकेतस्थळे/ पोर्टल्ससाठी जोडणी (लिंक)

संकेतस्थळावर अनेक ठिकाणी आपणास अन्य संकेतस्थळे / पोर्टल्स यांच्या जोडण्या दिसतील. यांची निर्मिती आणि देखभाल इतर शासकीय /अशासकीय/ खाजगी संघटनांमार्फत केली जाते. या जोडण्या आपल्या सुविधेसाठी उपलब्ध करून दिल्या आहेत. जेव्हा आपण बाह्य जोडणीची निवड करता, तेव्हा तुम्ही महावितरणच्या संकेतस्थळावरून बाहेर पडून बाह्य संकेतस्थळी पोहोचता, तुमची गोपनीयता आणि सुरक्षा धोरण ‘त्या’ बाह्य संकेतस्थळाच्या मालकाकडे / प्रायोजकाकडे जाते. त्या बाह्य संकेतस्थळाची माहिती आणि विश्र्वसनीयता यासाठी महावितरण जबाबदार नसून ,त्यात व्यक्त केलेल्या दृष्टिकोनाचे समर्थन करत नाही. या संकेतस्थळावर उपलब्ध जोडण्या आणि त्यांच्या यादीला आमचे समर्थन गृहीत धरण्यात येऊ नये.

इतर संकेतस्थळांव्दारे / पोर्टलव्दारे महावितरणच्या संकेतस्थळाशी लिंक

अन्य संकेतस्थळांव्दारे / पोर्टलव्दारे महावितरणच्या संकेतस्थळाची जोडणी अथवा आपण आमच्या संकेतस्थळावरील माहितीची जोडणी देऊ इच्छीत असाल, तर त्यासाठी पूर्वपरवानगीची आवश्यकता नाही. मात्र तुमच्या संकेतस्थळाच्या चौकटीमध्ये आमचे पृष्ठ दाखवण्याची परवानगी आम्ही देत नाही. आमच्या संकेतस्थळावरील पृष्ठे, वापरकर्त्याच्या नवीन ब्राउजर विंडोमध्ये उघडायला हवी.

अटी आणि शर्ती :

यासंकेतस्थळाची रचना, विकसन आणि देखभाल महावितरणद्वारे केली जात आहे. या संकेतस्थळावरील माहिती आमच्या विविध विभागांकडून पुरविली आहे. संकेतस्थळाचा वापर करताना, वापराबाबतचे नियम आणि अटी तुम्ही बिनशर्त मान्य करीत आहात असे गृहीत धरले जाईल. हे नियम आणि अटी तुम्हांला मान्य नसतील तर कृपया या संकेतस्थळाचा वापर करू नये. संकेतस्थळावरील मजकुराच्या अचुकतेबाबत सर्वतोपरी खबरदारी घेतली गेली असली, तरी हामजकूर कोणत्या ही कायदेशीर कारणासाठी पुरावा म्हणून वापरता येणार नाही. या संकेतस्थळाचा वापर करीत असताना कोणत्याही प्रकारचा खर्च, तोटा, दुष्परिणाम अथवा हानी झाल्यास त्यासाठी महावितरण जबाबदार राहणार नाही. भारतीय कायद्यानुसार या अटी आणि नियम लागू राहतील. या अटी आणि नियमा संदर्भातील कोणत्याही प्रकारचा वाद महाराष्ट्राच्या न्यायालयीन अधिकारक्षेत्रात राहील.

गोपनीयता धोरण :

एक सर्वसाधारण नियम म्हणून हे संकेतस्थळ तुमची व्यक्तिगत ओळख स्पष्ट करणारी कोणत्याही प्रकारची माहिती (जसे नाव, दूरध्वनी क्र. अथवा ई-मेल) स्वयंचलितरित्या आपल्याकडे ठेवत नाही. हे पोर्टल तुमच्या भेटीच्या वेळा आणि सत्र प्रवेश अशा प्रकारच्या माहितीची, सांख्यिकीय हेतूसाठी (जसे इंटरनेट प्रोटोकॉल, डोमेन नेम, ब्राउजर प्रकार, ऑपरेटिंग सिस्टम, भेटीची तारीख आणि वेळ इ.) नोंद घेते. आम्ही या माहितीचा उपयोग तुमच्या वैयक्तिक भेटीची ओळख म्हणून ठेवत नाही. या संकेत स्थळाच्या सुरक्षेला बाधा पोहोचवण्याचा प्रयत्न झाल्यास त्याचा मागोवा घेण्यासाठी आम्हांला या माहितीचा उपयोग होतो. कायदे अंमलबजावणी अभिकरणाचा, सेवा प्रदात्याच्या नोंदीतपासण्या बाबतचा लेखी आदेश असल्याशिवाय, वापरकर्त्याची किंवा त्याच्या ब्राऊझिंग क्रियांची ओळख आम्ही पटविणार नाही. महावितरण पोर्टलने ग्राहकाकडून वैयक्तिक माहिती देण्याची मागणी केल्यास, ती कशा प्रकारे वापरली जाईल, हे ग्राहकाला सांगितले जाईल.

स्वामित्व हक्क धोरण :

या पोर्टलवरील वैशिष्ट्यपूर्ण साहित्य विना शुल्काने, कोणत्याही स्वरूपात किंवा माध्यमात विनिर्दिष्ट परवानगीच्या आवश्यकतेशिवाय उद्धृत करता येईल. साहित्य अचूकपणे उद्धृत करण्यावर आणि अप्रतिष्ठाकारक रितीचा किंवा दिशाभूल करणाऱ्या संदर्भाचा वापर न करण्यावर हे अवलंबून आहे. जेथे साहित्य प्रकाशित करावयाचे असेल किंवा इतरांना निर्गमित करावयाचे असेल तेथे स्त्रोतास ठळकपणे आभिस्वीकृत करणे आवश्यक आहे. तथापि त्रयस्थाचा स्वामित्व हक्क असलेले साहित्य अशी या स्थळावर ओळख पटविण्यात आलेल्या अशा कोणत्याही साहित्याच्या उद्धृतीकरणाचे प्राधिकारपत्र संबंधित स्वामित्व हक्क धारण करणाऱ्याकडून प्राप्त करण्यात यावे.

उत्तरदायित्त्वास नकार :

या संकेतस्थळावर उपलब्ध माहिती आणि मजकूर योग्य आणि अद्ययावत ठेवण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र या माहितीचा वापर अथवा परिणामांची जबाबदारी महावितरण यांच्यावर राहणार नाही. सदरहू मराठी संकेतस्थळावरील मजकुरामध्ये कोणत्याही प्रकारची विसंगती, संभ्रम अथवा व्याकरणात्मक त्रुटी आढळल्यास वापरकर्त्याने संबंधित इंग्रजी संकेतस्थळाचा संदर्भ घ्यावा.

तक्रार अधिकारी तपशील :

माहिती तंत्रज्ञान (मध्यस्थ मार्गदर्शक तत्त्वे) नियम, २०११ नुसार, वापरकर्ता या नियमाच्या तरतुदींच्या उल्लंघनाविरुद्ध वेबसाइट सामग्रीबद्दल तक्रार नोंदवू शकतो. तक्रार अधिकारी तपशील:
उपमहाव्यवस्थापक (माहिती तंत्रज्ञान),
४ था मजला, माहिती तंत्रज्ञान विभाग.
प्रकाशगड, कॉर्पोरेट ऑफिस, महावितरण, मुंबई
ई-मेल- itpolicy_grievances@mahadiscom.in

Urja
Empowering the Consumer