लोगो
>मुख्य पृष्ठमुख्य पृष्ठ
>मराविविकंम विषयी मराविविकंम विषयी
>ग्राहक सेवाग्राहक सेवा
ऑनलाइन वीज आकार देयके पहाण्याची व त्यांची भरणा करण्याची सुविधा
ग्राहक वेब स्वयंसेवा  
महावितरण ग्राहक मोबाईल अॅप  
प्रिपेड मीटर रिचार्ज प्रणाली
गो ग्रीन साठी अर्ज
कामगिरीची मानके
वीज पुरवठा संहिता आणि वीज पुरवठ्याच्या अन्य शर्ती
वीज पुरवठ्याच्या शर्ती -मराविविकंम
वीज ग्राहकांचे अधिकार
अर्जाचा नमुना
NCE/CPP निर्णयांसाठी नागरिकांची सनद
ग्रीड कनेक्टिव्हिटी प्रोसिजर
वितरण मुक्त प्रवेश
सौर रूफ नेट मीटरिंग  
ओपन एक्सेस अर्ज   
उच्च दाब ग्राहकांना ऑनलाइन तक्रार निवारण प्रणाली  
आपल्या देयकाचे स्वरूप जाणून घ्या
कॉल सेंटरच्या संपर्कासाठी तपशील
Ease Of Doing Business(EoDB)  
   अधिक...   
>वितरण हानीवितरण हानी
>माहितीचा अधिकारमाहितीचा अधिकार
>प्रकल्प प्रकल्प
>कर्मचारी सुविधा कर्मचारी सुविधा
>निवृत्त कर्मचाऱ्यांसाठी  सूचनानिवृत्त कर्मचाऱ्यांसाठी सूचना
>छायाचित्र  दालनछायाचित्र दालन
>वीज  चोरी वीज चोरी
>प्रसिध्दीपत्रक प्रसिध्दीपत्रक
>महावितरण विद्युत वार्तामहावितरण विद्युत वार्ता
>प्रशिक्षण आणि सुरक्षा विभागप्रशिक्षण आणि सुरक्षा विभाग   
>महावितरण संग्रहितमहावितरण संग्रहित
>विनियामक माहितीविनियामक माहिती
>भार व्यवस्थापनभार व्यवस्थापन  NEW
>मानव संसाधन विभागमानव संसाधन विभाग
>रोजगार आणि सुसंधीरोजगार आणि सुसंधी
>डिस्ट्रीब्युशन फ्रांचायझी डिस्ट्रीब्युशन फ्रांचायझी
>पुरवठाकरण्यासाठी सेवापुरवठाकरण्यासाठी सेवा
>महत्वाचे दुवे (लिंक)महत्वाचे दुवे (लिंक)
>इतर इतर
 
महावितरणनेहमी विचारण्यात येणारे प्रश्न (एफएक्यू)

प्रश्न 1 : महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादित अतिरिक्त सुरक्षा ठेव का आकारते ?

उत्तर 1 : वीज उघड्या अटींनुसार सर्व राज्य विद्युत् मंडळांना त्यांच्या ग्राहकांकडून सुरक्षा ठेव जमा करण्याचे अधिकार देण्यात आले आहेत.

ग्राहक, देयकाचा भरणा विजेचा वापर केल्यानंतर करत असल्याने सुरक्षा ठेव घेणे आवश्यक ठरते. तसेच देयकाच्या रकमेचा भरणा करण्यासाठी त्यांना 10 ते 15 दिवसांचा अवधीही दिला जातो. ग्राहकाने देयकाचा भरणा केला नाही तरी वीज खंंडित करण्यापूर्वी त्याला तशी नोटीस द्यावी लागते व देयकाचा भरणा करण्यासाठी पुन्हा 15 दिवसांचा कालावधी द्यावा लागतो. अशा रीतीने, देयकाचा भरणा न करणारा ग्राहकही सुमारे 2 महिनेपर्यंत वीज वापरू शकतो. अशा प्रकरणी नुकसान टाळण्यासाठी घरगुती वीज वापरणाज्या ग्राहकाकडून दर मासिक देयकाच्या रकमेएवढी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून घेतली जाते. देयकाच्या कालावधीनुसार हा कालावधी वेगवेगळा असू शकतो.

महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादितने अलिकडेच वीज दरांत सुधारणा केल्या. त्यामुळे सुधारित वीज दरांनुसार अतिरिक्त सुरक्षा ठेव घेणे आवश्यक आहे. तसेच येथे ही गोष्टीही नमूद करणे आवश्यक आहे की 50 रुपये किंवा त्यापेक्षा जास्त रकमेच्या सुरक्षा ठेवीवर महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादित, पोस्टाच्या बचत खात्याच्या त्या त्या वेळी अस्तित्वात असलेल्या दराने व्याजही देत असते.

प्रश्न 2 : महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादितचे ग्राहकत्व कसे मिळते ? नवीन जोडणी घेण्यासाठी काय करावे लागते ?

उत्तर 2 : (एक) संभाव्य ग्राहक जागेचा कायदेशीर मालक / ताबेदार असला पाहिजे.

(दोन) आवश्यक ना हरकत प्रमाणपत्रासह त्याने घरगुती / वाणिज्यिक वीज वापरासाठी शाखा कार्यालयात आणि औद्योगिक वीज वापरासाठी उपविभाग / विभाग कार्यालयात प्रपत्र क-1 मध्ये
अर्ज करावा लागेल.

(तीन) भार सर्वेक्षण केल्यानंतर त्यास भरावयाच्या शुल्काची रक्कम सांगितली जाईल; ज्यात सेवा जोडणी शुल्क, सेवा तारमार्ग शुल्क, सुरक्षा ठेव इत्यादीचा समावेश असेल.

(चार) वरील शुल्काचा भरणा केल्यानंतर ग्राहक, परवानाधारक वीज कंत्राटदाराने वायरिंगच्या केलेल्या चाचणीचा अहवाल सादर करील.

(पाच)सेवा जोडणी कालानुक्रमानुसार दिली जाईल.

प्रश्न 3 : देयकाची पद्धती कशी आहे ?

उत्तर 3 : संच मांडणीनंतर मीटरबाबतचा तपशील, सुरूवातीचे मीटर वाचन याची माहिती देयक शाखेस दिली जाईल. पूर्वनिश्चित चक्रांकन क्रमानुसार पहिले देयक दिले जाईल. घरगुती, बिगर घरगुती, औद्योगिक, कृषि ग्राहकांना मासिक, द्वैमासिक व त्रेमासिक पद्धतीने देयक दिले जाते. देयकातील रकमेचा भरणा देयकावर दर्शविलेल्या अंंतिम तारखेपूर्वी करावा लागेल.

प्रश्न 4 : मंजूर भार वाढवून कसा घ्यावा?

उत्तर 4 : मंजूर भार वाढवून घेण्यासाठी घरगुती, वाणिज्यिक आणि औद्योगिक (लघु दाब) ग्राहकाने संबंधित शाखा / उपविभाग प्रभारीकडे अर्ज करावा. उच्च दाब ग्राहकाने अधीक्षक अभियंत्याकडे अर्ज करावा. प्रत्यक्ष शक्यतेबाबत निश्चिती करून घेऊन भार मंजूर केला जातो व खर्चाचा अंदाज दिला जातो; ज्यात सेवा तारमार्ग शुल्क व सुरक्षा ठेव यांचा समावेश असतो.

प्रश्न 5 : एखाद्याचा वीज वापर कसा तपासायचा?

उत्तर 5 : साधनाची क्षमता व ते किती काळापासून वापरात आहे यावर वीज वापर अवलंबून असतो. तुमचा वीज वापर जाणून घेण्यासाठी तुम्हाला खालील दूवे उपयोगी पडू शकतील.

प्रश्न 6 : तक्रारी कशी नोंदवायची ?

उत्तर 6 : (एक) वीज पुरवठा खंडित झाल्यावर ग्राहकास एक तर जवळच्या फ्यूज ऑफ कॉल सेंटरशी दूरध्वनीद्वारे संपर्क साधून किंवा जातीने भेटून तक्रार नोंदवावी लागते किंवा त्या ठिकाणच्या कॉल सेंटरशी संपर्क साधावा लागतो. तक्रार नोंदवह्या सोयीच्या विविध ठिकाणी ठेवलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादितच्या कर्मचाज्यास योग्य ठिकाणी तात्काळ पोहोचणे सोपे व्हावे यासाठी तक्रार नोंदविताना ग्राहकाने तक्रारीत त्याचे नाव, ठिकाण ग्राहक क्रमांक आणि खांब क्रमांक लिहावयाचा आहे. फ्यूज ऑफ झाल्याच्या तक्रारीचे निवारण करण्यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादित कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारत नाही.

(दोन) मोठा दोष निर्माण झाल्यास संपूर्ण क्षेत्राची वीज जाते. अशा वेळी वीज पुरवठा पुन्हा सुरळीत करण्यासाठी थेाडा अधिक वेळ लागतो.

(तीन) चुकीचे मीटर वाचन, देयकाचा भरणा केला असतानाही थकबाकी दाखविणे अशा काही चुका ऊर्जा देयकात झाल्या असल्यास दुरुस्तीसाठी ग्राहकाने महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादितच्या नजिकच्या कार्यालयाशी संपर्क साधावा. देयकाच्या तक्रारी हाताळण्याचे काम शहर क्षेत्रात विभागीय कार्यालय व ग्रामीण क्षेत्रात वितरण केंद्र किंवा उपविभागीय कार्यालय करते. (अधिक माहितीसाठी)

(चार) तक्रार निवारणास अवाजवी विलंब झाल्यास त्या संबंधित कार्यालयातील वरिष्ठ अधिकाज्याशी कामाच्या कोणत्याही दिवशी ग्राहक संपर्क साधू शकतो.

(पाच) ग्राहकाची इच्छा असल्यास, विशेष प्रसंगी वीज पुरवठा पूर्ववत व्हावा यासाठी महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनी मर्यादित तिच्या फ्यूजमनला ग्राहकाच्या जागेवर पाठवीत असते, व अशा वेळी किरकोळ शुल्क आकारले जाते.

प्रश्न 7 : सुरक्षेविषयी खात्री कशी करून घ्यावी ?

उत्तर 7 : (1) ग्राहकाने पुरवठ्याच्या ठिकाणी अर्थ लिकेज / ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किट यापासून संरक्षण मिळण्यासाठी (सर्किट ब्रेकर्स / स्विचेस) सुरक्षाविषयक उपकरणे ठेवावीत

(2) तुमच्या जागेत तुम्ही अर्थिंग चांगल्या प्रतीचे करावे.

(3) संचामांडणीसाठी आयएसआय चिन्हांकित केबल्स आणि योग्य क्षमतेची अवजारे वापरावीत आणि वायरिंग केवळ परवानाधारक विद्युत् कंत्राटदाराकडूनच करून घ्यावे.

(4) मेन स्विचमध्ये योग्य क्षमतेची फ्यूज वायरच नेहमी वापरावी.

(5) तुमच्या संचामांडणीतील दोष निवारणसाठी केवळ परवानाधारक विद्युत् कंत्राटदारासच बोलवा. वीज पुरवठ्याशी संबंधित कोणत्याही अडचणीच्या निवारणासाठी केवळ महाराष्ट्र राज्य विद्युत् वितरण कंपनीच्या अधिकाज्यांशीच त्यांच्या कार्यालयात संपर्क साधावा.

(6) अतिरिक्त भार टाळण्यासाठी, एक बिंदू आऊट ले शी बहुविध सामग्री जोडू नका. विस्कळीत जोडण्या व सांधे करू नका.

(7) एका बिंदूवरून दुसज्या बिंदूवर किंवा एक जागेतून दुसज्या जागी वीज पुरवठा करण्यासाठी उघड्या वायर्स वापरू नका. ते धोक्याचे असून त्यामुळे अपघात होऊ शकतात. प्रवाहित तारेशी / बिंदूशी ढवळाढवळ करू नका. त्यात तुमचा जीव जाऊ शकतो.

 

 

 

 
 
 
 
 
शेवटचे पुनरावलोकन : Friday, 08-Apr-2011 17:40:06 IST
© २००४-२०१५ हे महावितरणचे अधिकृत संकेतस्थळ आहे. सर्व हक्क सुरक्षित.
संकेतस्थळाची मालकी : महावितरण आणि देखभाल : इंटरपोल टेक्नोलॉजीस प्रायवेट लिमिटेड